21 जूनला या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 3.53 रुपये होती. मात्र बीएसईवर मागील ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजे 29 ऑक्टोबर 2.36 लाख रुपयांवर एक शेअर बंद झाला. फक्त चार महिन्यात या स्टॉकमध्ये जवळपास 66,926 पट वाढ झाली. आता हा स्टॉक एमआरएफपेक्षा जास्त महाग झाला आहे. मागील ट्रेडिंग सत्रात हा शेअर 1.23 लाख रुपयांच्या भावावर बंद झाला.
advertisement
तेजी का आली?
एलसिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअर्समध्ये तेजी येण्यामागची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे प्रमोटर्सने 29 ऑक्टोबरला शेअर पुन्हा बीएसईवर लिस्ट केला. त्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप वाढून 4,725 कोटी रुपयांवर पोहोचले. हे लिस्टिंग स्पेशल कॉल ऑक्शनच्या माध्यमातून केलं गेलं. प्रमोटर्सनी प्रतिशेअर 1,61,023 रुपयांवर डिलिस्ट केलं आणि मग पुन्हा लिस्टिंग केलं. दुसरं कारण म्हणजे एशियन पेंट्स लिमिटेडजवळ या कंपनीची 2.95 टक्के भागीदारी आहे, ज्याची किंमत 8,500 कोटी रुपये आहे. या दोन कारणांनी कंपनीच्या रि-लिस्टिंगला व्हॅल्युएशन जास्त झालं आणि शेअर्सचे भाव खूप वाढले.
कंपनी काय करते?
एलसिड इन्व्हेस्टमेंट्स कंपनीचे काम लोकांच्या पैशांची गुंतवणूक करणं आहे. ही कंपनी शेअर, डिबेंचर, म्युचुअल फंडामध्ये पैसे लावते. ही कंपनी दोन सब्सिडरीज मुराहार इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग आणि सुप्तासवर इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंगच्या माध्यमातून हे काम करते. या कंपनीची व्हॅल्यु एकेकाळी सर्वाधिक 4.58 लाख रुपये झाली होती.
200 रुपये झाले एक कोटी रुपये
या कंपनीत कुणी 200 रुपये गुंतवले असते तर त्याची आता किंमत दोन कोटी रुपये झाली असती. 3.53 रुपये प्रतिशेअर भावाने 200 रुपयांत कंपनीचे 79 शेअर येतात. आता एका शेअरची किंमत 2.36 लाख रुपये झाली आहे. त्यानुसार, 79 शेअर्सची किंमत 1,86,44,000 रुपये होईल.