TRENDING:

‘या’ कंपनीच्या शेअरची किंमत एक रुपया, बोनस शेअर आणि डिव्हिडंट देण्याचा कंपनीचा मोठा निर्णय

Last Updated:

शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स लिस्टेड असून, ज्यामध्ये शुक्रवारी (6 डिसेंबर 2024) वेगानं वाढ झाली. या पेनी स्टॉकपैकी एक म्हणजे थिंक पिक्चर्स लिमिटेड.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शेअर मार्केटमधील पेनी स्टॉक्समध्ये तुम्हाला माहिती असेलच. पेनी स्टॉक्समध्ये मोठे रिटर्न मिळण्याची शक्यता असली तरी या शेअर्समध्ये पैसे बुडण्याचा धोकाही अधिक असतो. पण त्यानंतरही अनेकजण पेनी स्टॉक्समध्ये पैसे गुंतवतात. सध्या शेअर मार्केटमधील एक पेनी स्टॉक असाच चर्चेत असून त्याची किंमत एक रुपयाच्या आसपास आहे.
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स लिस्टेड असून, ज्यामध्ये शुक्रवारी (6 डिसेंबर 2024) वेगानं वाढ झाली. या पेनी स्टॉकपैकी एक म्हणजे थिंक पिक्चर्स लिमिटेड. या स्टॉकची किंमत दोन रुपयांपेक्षा कमी आहे. त्यातच आता ही कंपनी लवकरच बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याचा विचार करतेय.

थिंकिंक पिक्चर्स लिमिटेडचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 1.84 रुपयांवर उघडला होता. ही आधीच्या बंद किंमतीच्या म्हणजेच 1.77 रुपयांपेक्षा 4.52 टक्के जास्त आहे. थिंकिंक पिक्चर्सच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अप्पर सर्किट लागलं. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये या शेअरची किंमत तब्बल 11.75 रुपये होती. तर, 5 डिसेंबर 2024 रोजी या शेअरची किंमत 1.70 रुपये होती. जी गेल्या 52 आठवड्यांतील नीचांकी ठरली.

advertisement

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीची योजना

कंपनीनं गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणण्याची तयारी केली आहे. थिंकिंक पिक्चर्सच्या मते, बोर्ड पात्र भागधारकांच्या प्रत्येकी एका शेअरमागे दोन बोनस शेअर देण्याचा प्रस्तावाचा विचार करीत आहे. तसेच इक्विटी शेअर्सवर 100 टक्के लाभांश जाहीर करण्याच्या प्रस्तावावर बोर्डाचा विचार सुरू आहे.

थिंकिंक पिक्चर्सच्या मते, हॉलिवूडमध्ये प्रवेश करून जागतिक मनोरंजन बाजारपेठेत विस्तार करण्याच्या धोरणात्मक प्रस्तावाचेही बोर्ड मूल्यांकन करणार आहे. सध्या या कंपनीमध्ये प्रमोर्टसची हिस्सेदारी शून्य आहे. जागतिक गुंतवणूकदार बोफा सिक्युरिटीज युरोप एसए-ओडीआई यांच्याकडे कंपनीची 1.92 टक्के भागीदारी असून ज्याचे मूल्य 5,69,311 शेअरच्या बरोबर आहे.

advertisement

16 डिसेंबरला होणार मीटिंग

थिंकिंक पिक्चर्सनं 5 डिसेंबर 2024 ला कंपनीची बोर्डाची मीटिंग केव्हा होणार आहे, याबाबत माहिती दिलीय. त्यानुसार कंपनीची मीटिंग 16 डिसेंबर 2024 ला होणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या बोर्डाच्या मीटिंगमध्ये धोरणात्मक विकास उपक्रमांवर चर्चा करण्यात येणार आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आजकाल खूप सोपे झाले आहे. मात्र, गुंतवणूक करताना खबरदारी घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/Share Market/
‘या’ कंपनीच्या शेअरची किंमत एक रुपया, बोनस शेअर आणि डिव्हिडंट देण्याचा कंपनीचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल