TRENDING:

मॉर्गन स्टॅन्लीकडे तीन स्टॉक्स तेजीत; 3 वर्षांत नफा CAGR 70 टक्क्यांवर, तुम्ही खरेदी करणार?

Last Updated:

मॉर्गन स्टॅनली समर्थित स्टॉक्सची माहिती घेऊया. या स्टॉक्सचा तीन वर्षांतला निव्वळ नफा CAGR 70 टक्क्यांपर्यंत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मॉर्गन स्टॅन्ली एशिया (सिंगापूर) प्रायव्हेट लिमिटेड ही एक अग्रगण्य फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर फर्म आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, सिक्युरिटीज ट्रेडिंग आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये या फर्मचा हातखंडा आहे. फर्म आशिया-पॅसिफिक क्षेत्रातल्या विविध ग्राहकांना भांडवल उभारणी, विलीनीकरण आणि अधिग्रहण सल्ला आणि रिसर्च सर्व्हिसेससह सर्वसमावेशक उपाय सुचवते आणि देते. नवीन कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार, या फर्मकडे एकूण 1,980.8 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असलेले 11 स्टॉक आहेत. मॉर्गन स्टॅनली समर्थित स्टॉक्सची माहिती घेऊ या. या स्टॉक्सचा तीन वर्षांतला निव्वळ नफा CAGR 70 टक्क्यांपर्यंत आहे.
शेअर मार्केट
शेअर मार्केट
advertisement

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड : ही एक भारतीय होल्डिंग कंपनी आहे. कंपनीच्या उपकंपन्यांमध्ये नुवामा क्लिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, नुवामा फायनान्शियल सर्व्हिसेस इंक, नुवामा वेल्थ फायनान्स लिमिटेड, नुवामा वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, नुवामा अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड आणि अन्य कंपन्यांचा समावेश होतो. नुवामा वेल्थ मॅनेजमेंटचं मार्केट कॅपिटल 23,307 कोटी रुपये आहे. हा स्टॉक शुक्रवारी 6,509.10 रुपयांवर बंद झाला. आजदेखील (25 नोव्हेंबर) हा शेअर 1.60 टक्क्यांच्या वाढीसह 6,590 रुपयांवर राहिला. मॉर्गन स्टॅन्ली एशिया (सिंगापूर) प्रायव्हेट लिमिटेडकडे सप्टेंबर 2024 पर्यंत या कंपनीचे 4,25,716 शेअर्स होते. म्हणजेच फर्मकडे कंपनीची 1.2 टक्के भागीदारी आहे. Q2FY23मध्ये कंपनीचा एकत्रित नफा 85 कोटी रुपये होता. Q2FY25 मध्ये त्यात 257 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीचा तीन वर्षांचा निव्वळ नफा CAGR 44.60 टक्के आहे.

advertisement

सायंट डीएलएम लिमिटेड : ही इंटिग्रेट इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस कंपनी आणि सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी आहे. कंपनीच्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत (भारतात) आणि परदेशांचा समावेश होतो. कंपनीचं इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग ग्राहकांना बिल्ड-टू-प्रिंट (B2P) आणि बिल्ड-टू-स्पेसिफिकेशन (B2S) सेवेच्या रूपात पुरवलं जातं. कंपनीचं मार्केट कॅपिटल 5,028 कोटी रुपये आहे. हा स्टॉक शुक्रवारी 634 रुपयांवर बंद झाला. सोमवारी हा स्टॉक 646 रुपयांपर्यंत गेला. मॉर्गन स्टॅन्ली एशिया सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेडकडे सप्टेंबर 2024 पर्यंत 2,600,527 शेअर्स होते. हे प्रमाण कंपनीच्या 3.3 टक्के इतकं आहे. Q2FY23मध्ये कंपनीचा एकत्रित नफा सात कोटी रुपये होता. Q2FY25 मध्ये त्यात 16 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीचा तीन वर्षांचा निव्वळ नफा CAGR 31.73 टक्के आहे.

advertisement

स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड : ही कंपनी आयपी आधारित ड्रग्ज प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग करते. कंपनी फार्मास्युटिकल आणि बायो-फार्मास्युटिकल अशा दोन क्षेत्रांत काम करते. कंपनीचं मार्केट कॅपिटल 13,876 कोटी रुपये आहे. सोमवारी कंपनीच्या शेअरची किंमत घसरली आणि तो 1,406.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मॉर्गन स्टॅन्ली एशिया सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेडकडे सप्टेंबर 2024 पर्यंत या कंपनीचे 1,240,786 शेअर्स होते. म्हणजेच फर्मकडे कंपनीची 1.4 टक्के भागीदारी आहे.

advertisement

शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. गॅप अप ओपनिंगमुळे, मार्केट रेझिस्टन्स लेव्हलच्या वर उघडला आणि निफ्टी 24300 च्या आसपास होता. या काळात मार्केटमधल्या जवळपास सर्वच क्षेत्रांत खरेदीचा कल दिसून आला.

मराठी बातम्या/मनी/Share Market/
मॉर्गन स्टॅन्लीकडे तीन स्टॉक्स तेजीत; 3 वर्षांत नफा CAGR 70 टक्क्यांवर, तुम्ही खरेदी करणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल