पीसी ज्वेलर्सच्या कंपनीने ग्राहकांसाठी नुकतीच एक घोषणा केली आहे. सध्या 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेले इक्विटी शेअर्स स्पिल्ट करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत बैठक घेण्यात येईल. बीएसईवर स्टॉक रु. 156.70 वर आज उघडला आहे. जो याआधी 151 रुपयांवर बंद झाला होता. मागच्या तुलनेत ही वाढ 3.77 टक्के आहे. इंट्रा-डेला या स्टॉकची किंमत 157.30 वर पोहोचली, जी 52 आठवड्यांचा विचार करता रेकॉर्डब्रेक करणारी होती.
advertisement
स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 25.45 आहे. एनएसईवर आज त्याचे शेअर्स 2.19 टक्क्यांच्या वाढीसह 154.35 रुपयांवर बंद झाला. “त्याच बैठकीत बोर्ड कंपनीच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीवरही विचार करेल,” असे पीसी ज्वेलर यांनी एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले. कंपनीने म्हटले आहे की काही नामांकित व्यक्तींसाठी तिच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग/डीलिंग करण्याची ट्रेडिंग विंडो तात्काळ प्रभावाने बंद केली जात आहे. 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे जाहीर केल्यानंतर केवळ 2 दिवसांनी ट्रेडिंग करु शकतात असं म्हटलं आहे.
या शेअर्समध्ये एका वर्षात सुमारे 474 टक्के मल्टीबॅगर रिटर्न गुंतवणूरदारांना मिळाला आहे. या वर्षी आतापर्यंत त्यात 203 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जूनच्या तिमाहीमध्ये 401 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू मिळाला होता. वर्षाचा विचार केला तर नेट प्रॉफिट 190 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी 171 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. मात्र आता पीसी ज्वेलर्सचे शेअर्स अधिक मजबूत झाले असून ते रॉकेटच्या स्पीडने रिटर्न्स देत आहेत.
सप्टेंबर अखेर होणाऱ्या बैठकीमध्ये जे निर्णय होतील त्याचाही परिणाम शेअरवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर शेअर घेण्याचा विचार करत असाल तर या बैठकीतल्या निर्णयांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कंपनीने आपला व्यावसाय फक्त पारंपारिक अलंकारांवर अवलंबून ठेवला नाही. ऑनलाईन आणि ई-कॉमर्सचा उपयोग करुन त्यांनी घरोघरी आपले वेगवेगळे प्रोडक्ट्स पोहोचवण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे.