परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात एफआयआयचा कल विक्रीकडे असल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण कायम आहे. 27 सप्टेंबरच्या 26,277 या विक्रमी उच्च पातळीवरून निफ्टी आता 10 टक्क्यांनी घसरून 23,500च्या आसपास पोहोचला आहे. विश्लेषकांच्या मते, ही घसरण आत्ताच थांबणार नाही. काही तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरपर्यंत निफ्टी 21,300 पर्यंत घसरू शकतो.
सामान्यपणे जेव्हा एखादा निर्देशांक त्याच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून 10 टक्के घसरतो तेव्हा त्याला करेक्शन अर्थात सुधारणा मानलं जातं; पण ही घसरण जेव्हा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याला बियर मार्केट अर्थात मंदीच्या संकेताची सुरुवात मानलं जातं. सध्या निफ्टी 10 टक्के घसरल्यानंतर अनेक विश्लेषक हे बियर मार्केटचे संकेत मानत आहेत.
advertisement
कासदेकॉस डॉट कॉमचे जय बाला यांनी सांगितलं, की 'माझ्या मते निफ्टी डिसेंबरच्या अखेरीपर्यंत 21,300 च्या आसपास जाऊ शकतो. तसंच बँकिंग निर्देशांक 42,000 च्या आसपास पोहोचू शकतो. या घसरणीदरम्यान काही काळासाठी पॉझदेखील पाहायला मिळू शकतो. मग तो 47,000 ते 49,000 पर्यंत पोहोचू शकतो.'
एफआयआयनी निफ्टीतून सप्टेंबरच्या उच्चांकी स्थितीनंतर आतापर्यंत 1.2 लाख कोटी रुपये अशी विक्रमी रक्कम काढली आहे. दुसऱ्या तिमाहीतलं कमी उत्पन्न आणि त्यानंतर होणारं डाउनग्रेडिंग ही त्यामागची मुख्य कारणं आहेत. सीएलएसएचे लॉरेन्स बालांको यांच्या मते, 'भारतात सतत कमी कामगिरीचा कल कायम राहू शकतो आणि तो 2025च्या पहिल्या तिमाहीपर्यंत सुरू राहू शकतो. निफ्टीला 22,800 च्या पातळीवर सपोर्ट मिळू शकतो. त्यानंतर मोठ्या उसळीची शक्यता कमी दिसते.'
अनेक तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्या सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जय बाला यांनी सांगितलं, की 'सध्या तुम्ही बाजाराच्या बाहेर राहून हातात रोख रक्कम ठेवणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा फायदा आहे. तुम्ही 100 टक्के रोख रकमेत राहू शकता; मात्र ही गोष्ट संस्थांना शक्य नाही. या स्थितीत शक्य तितकी जास्तीत जास्त रोख जमा करा आणि बाजारातल्या चढ-उताराच्या स्थितीचा फायदा घ्या.'
सॅमको सिक्युरिटीजच्या मते, ''निफ्टी एक समान 'रायझिंग कर्व्ह चॅनेल'मध्ये ट्रेड करत आहे. हा चॅनेल जून 2022 च्या खालच्या स्तरापासून बनायला सुरुवात झाली. या चॅनेलच्या जवळपास निफ्टीला सपोर्ट मिळत आहे आणि 200-DMA (डेली मूव्हिंग अॅव्हरेज) त्याला आधार देत आहे. जर आरएसआयमध्ये (रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ निर्देशांक) सुधारणा झाली, तर निफ्टीमध्ये तांत्रिक उसळी लवकरच पाहायला मिळू शकते.'
अॅक्सेस म्युच्युअल फंडचे जयेश सुंदर यांच्या मते, ''सध्या बाजारात जोखीम आणि लाभाचं गुणोत्तर संतुलित आहे. गुंतवणूकदारांनी त्यांची जोखीम सहनशीलता आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार समतुल्य दृष्टिकोन ठेवावा. जर बाजार गडगडला तर ते त्याकडे इक्विटीत गुंतवणूक वाढवण्याची संधी म्हणून पाहू शकतात.'
