एकीकडे फार्मा सेक्टरचे शेअर्स रॉकेटच्या स्पीडने धावत आहेत. तर दुप्पट कमाई करून देणारे IT सेक्टरचे शेअर्स विकण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे. Cipla, L&T, Dr Reddy's Labs, Hero MotoCorp आणि Bajaj Auto हे शेअर्स नेहमीपेक्षा जास्त वेगानं आज वाढले आहेत. या शेअर्सच्या किंमतीमध्ये 0.60% ते 8.25% पेक्षा जास्त वाढ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंद आहे.
advertisement
टेक महिंद्रा, इन्फोसिस, बीईएल, टीसीएस आणि टायटन या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती धडामकन खाली कोसळल्या आहेत. त्यामुळे हे शेअर्स विकायचे की होल्ड करायचे असा संभ्रम काही गुंतवणूकदारांच्या मनात आहे. सुरुवातीच्या सत्रादरम्यान 1% ते 1.7% ची घट दिसून आली होती.
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, L&T, PVR Inox, Godrej Properties, Oberoi Realty, ITC, Voltas आणि Ramkrishna Forgings या शेअर्सवर तज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे. यापैकी कोणते शेअर्स घ्यावेत, कोणते होल्ड करावे आणि कोणते विकावेत याबाबतही मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. आज शेअर मार्केट थोडं फ्लॅट सुरू असल्याने गुंतवणूकदारही चिंतेत आहेत.
रचना वैद्य यांनी L&T शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 3400 रुपयांचा स्टॉपलॉस याला लागेल. तर याची टार्गेट प्राइज 3500 रुपये प्रति शेअरकडे जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. प्रकाश गाबा यांनी PVR Inox खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरचा स्टॉपलॉस 1540 कडे जाण्याची शक्यता आहे. मानस जयसवाल यांनी Godrej Properties विकण्याचा करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरचा स्टॉपलॉस 2931 कडे जाण्याची शक्यता आहे.
राजेश सातपुते यांनी Oberoi Realty शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे तर अमित सेठ यांनी ITC शेअर घेण्याचा सल्ला दिला आहे. आशीष बहेती यांनी Voltas शेअर विकावेत असा सल्ला दिला आहे. अम्बरीश बलिगा यांनी Ramkrishna Forgings शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
(शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. इथे दिलेली मतं ही ब्रोकरेज फर्मची वैयक्तिक मते आहेत. यासाठी वेबसाइट जबाबदार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा आर्थिक सल्लागार किंवा प्रमाणित तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.)