DCX Systems Ltd, Tata Motors, Ola Electric, Equitas SFB, LIC, Aarti Industries, Whirlpool, Metropolis healthcare, Fortis Healthcare, Asian Paints, Divi’s Labs, Mawana Sugars, Relaxo Footwears, GR Infra, Biocon, JSW Steel, Advanced Enzyme Technologies या कंपन्यांचे शेअर्स आज मार्केटमध्ये गेमचेंजर ठरू शकतात.
या सगळ्या कंपन्यांचे शेअर्सनी मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला आहे. मात्र गेल्या आठवडाभरात मार्केट डाऊन असल्याने शेअर्सच्या किंमती घसरल्या होत्या. आता मार्केट स्टेबल झाल्यानंतर पुन्हा एकदा या कंपन्यांचे शेअर्स सुसाट पळण्याची शक्यता आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर्स असतील तर आज शेअर मार्केटवर तुम्ही नजर ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, शेअर मार्केट शुक्रवारी 700 अंकांनी खाली कोसळला होता. मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी बँकिंग, टेलिकॉम, मेटल, ऑइल आणि गॅस, रियल्टी शेअर्सच्या विक्रीमुळे किंचित घसरणीसह बंद झाले. जागतिक निर्देशांकांमध्ये सुधारणा असूनही, FII फंड काढण्यामुळे भारतीय बाजारांवर परिणाम होत आहे. यूएस फेडने व्याजदरात कपात केली असली तर त्याचे दूरगामी परिणाम सकारात्मक बाजारावर दिसून आले नाहीत.
सध्या शेअर मार्केटचा ट्रेंड पाहून सावधपणे पावलं उचलणं आवश्यक आहे. BRITANNIA, HINDALCO, ONGC यांच्या तिमाहीचा अहवाल आज येणार आहे. त्यावर शेअर बाजारात मोठा परिणाम देखील दिसून येईल.