गेल्या एका महिन्याच्या कालावधीत सोमा टेक्स्टाइल कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत त्या शेअरने 60 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसंच, मागच्या वर्षभराचा विचार केला, तर गुंतवणूकदारांना सोमा टेक्स्टाइल कंपनीच्या शेअरमुळे अगदी बंपर नफा मिळाला आहे. या कालावधीत या शेअरने तब्ब्ल 180 टक्क्यांची मल्टिबॅगर वृद्धी नोंदवली. पाच वर्षांच्या लाँग टर्मच्या गुंतवणूकदारांचा विचार केला, तर त्यांना या शेअरमुळे 1800 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे.
advertisement
पेनी स्टॉकवर पैसे लावणं अनेकदा जोखमीचंच असतं; मात्र ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता असते, त्यांनी यात गुंतवणूक केल्यास हे शेअर्स अक्षरशः मालामाल करतात, हे सोमा टेक्स्टाइलच्या शेअरवरून दिसून आलं आहे.
आज, गुरुवारी सोमा टेक्स्टाइल कंपनीच्या शेअरने 46.30 रुपयांच्या पातळीवर कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच यात मोठी खरेदी दिसली. त्यानंतर हे शेअर 20 टक्के अपर सर्किटसह 54.84 रुपयांच्या लेव्हलवर ब्लॉक झाले. पेनी स्टॉकमध्ये व्यवहार करणाऱ्यांमध्ये हा स्टॉक खूप लोकप्रिय आहे. टेक्स्टाइल सेक्टरमधल्या या स्टॉकने गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बाजारात करेक्शन सुरू असूनही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करणं हे कमी-अधिक प्रमाणात जोखमीचं असतंच; त्यामुळे प्रत्येकाने गुंतवणूक करताना तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.