मार्केट अॅनॅलिस्ट्स म्हणतात की, सध्या बाजार ओव्हर सोल्ड झोनमध्ये आहे आणि शॉर्ट-टर्ममध्ये यात तेजी येऊ शकते. आज 12 फेब्रुवारीला सेन्सेक्सने सुमारे 900 अंकांची गटांगळी खाल्ली पण त्यानंतर इंट्राडेमध्ये खूप वेगाने रिकव्हरी केली. खरं तर आजच्या सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स कोलमडून 76,000 च्या खालीही गेला होता. तेव्हाच निफ्टी पण 22,800 च्या खाली आला होता.
advertisement
जियोजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे मुख्य इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजिस्ट डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी गुंतवणुकदारांना लार्जकॅप शेअर्सवर फोकस करायचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ‘मिड आणि स्मॉलकॅप शेअर्स अजूनही ओव्हर व्हॅल्युड आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आता आपली गुंतवणूक फेअर व्हॅल्युएशन असलेल्या लॉर्जकॅप स्टॉक्सकडे वळवायला हवी.’ बाजारात शॉर्ट-टर्ममध्ये रिकव्हरी होऊ शकते पण, परदेशी गुंतवणुकदारांनी सतत विक्री सुरू ठेवल्याने ही तेजी ठराविक प्रमाणातच असेल.
परदेशी गुंतवणूकदार सतत भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. मंगळवारी 11 फेब्रुवारी त्यांनी सुमारे 4,486.41 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. फेब्रुवारीत आतापर्यंत त्यांनी 17,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स विकले आहेत. जानेवारीत त्यांनी 78,027 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.
बाजार बॉटमजवळ आला आहे?
शेअर बाजार आता बॉटम प्राईजजवळ आला आहे का, की आणखीही किमती घसरू शकतात? या प्रश्नावर तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत.
नियोजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे मुख्य मार्केट स्ट्रॅटजिस्ट, आनंद जेम्स यांनी सांगितलं की शेअर बाजारात प्रत्येक तेजीपूर्वी आव्हानांचा काळ येतो. निफ्टीने आज 23,060 ची महत्त्वाची सपोर्ट लेव्हल टेस्ट केली आहे आणि नंतर तो घसरला. त्यामुळे रिकव्हरीची आशा वाढली असली तरीही आणखी मोठ्या अपस्विंगची शक्यता तशी कमीच वाटते.
तर रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले, ‘निफ्टीने 23,200 चा स्तर तोडल्यामुळे मजबूत पुनरागमनाच्या आशा धूसर झाल्या आहेत. मार्केट आता पुन्हा 22,800 च्या स्तरापर्यंत खाली जाण्याची शक्यता वाढली आहे. सर्वाधिक चिंता मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये सुरू असलेल्या विक्रीची आहे, हे इंडेक्स खूपच कमकुवत आहेत त्यामुळे गुंतणुकदारांनी यात पैसे गुंतवताना सावध रहायला हवं.
मेहता इक्विटीजचे सीनिअर व्हाईस-प्रेसिडंट (रिसर्च) प्रशांत तपासे म्हणाले, ‘ बाजाराचा सेंटिमेंट अजूनही नाजूकच आहे. सध्या बाजारात निराशा पसरली आहे. निफ्टी 23,000 अंकांखाली गेला तर आणखी पडझड होऊ शकते. परदेशी गुंतवणुकदारांनी या वर्षी आत्तापर्यंत सुमारे एक लाख कोटी रुपये बाजारातून बाहेर काढले आहेत. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या टेरिफबद्दलच्या धमक्यांमुळेही मार्केटमध्ये चिंतेचं वातावरण दिसत आहे.
(Disclaimer: इथं दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जोखिमेचं आहे. विशेषतः F&O सेगमेंटमध्ये ट्रेडिंग खूप जोखिमयुक्त असते. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)