बँकिंग आणि डिफेन्स सेक्टरमध्ये मजबूत स्थिती
मार्च महिन्यात पाच सत्रांमध्ये घसरणीनंतर आता बाजार पुन्हा सावरताना दिसत आहे. एप्रिलसाठी गुंतवणूकदार वेगवेगळ्या सेक्टरवर लक्ष ठेवत आहेत. बँकिंग आणि फायनान्शियल क्षेत्रात चांगली स्थिती दिसून येत आहे. यासोबतच डिफेन्स क्षेत्रात मोठे ऑर्डर्स येत असून, सरकारकडूनही संरक्षण क्षेत्राला मोठा पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांत भारत डायनॅमिक्स आणि BEL यांना मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात 15-20% वाढ अपेक्षित आहे.
advertisement
EMS क्षेत्र आणि सरकारचा नवीन भर
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (EMS) क्षेत्रावर सरकारचा विशेष भर आहे. भारतातच कॉम्पोनेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि पीसीबी उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे EMS कंपन्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांतील घसरणीनंतर या स्टॉक्समध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे.
सिमेंट क्षेत्रातील तेजी
सिमेंट क्षेत्रात मोठे संमेलन (कंसॉलिडेशन) सुरू आहे. मोठ्या कंपन्या छोटे खेळाडू संपवत आहेत, ज्यामुळे त्यांना उत्पादन खर्च कमी करण्यास मदत मिळत आहे. डिमांड वाढत असल्याने सिमेंटच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. सरकारच्या वाढत्या कॅपेक्समुळेही या क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट आणि अंबुजा सिमेंट हे प्रमुख स्टॉक्स चांगली कामगिरी करत आहेत.
हॉटेल क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचा कल
हॉटेल क्षेत्रातही तेजीची चिन्हे आहेत. विशेषतः ITC हॉटेल्सचा स्टॉक सध्या स्वस्त मिळत असून, त्यात चांगली वाढ अपेक्षित आहे. ऑपरेटिंग मार्जिन सुधारल्याने गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक आकर्षक ठरू शकतो.
गुंतवणूकदारांची पुढील रणनीती
गुंतवणूकदारांनी बँकिंग, डिफेन्स, EMS आणि सिमेंट क्षेत्राकडे लक्ष द्यावे. तसेच, हॉटेल सेक्टरमध्येही चांगली संधी उपलब्ध आहे. बाजार सध्या सकारात्मक असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे.
हे ही वाचा : गुढीपाडव्यानंतर शेअर मार्केटमध्ये काय होणार? या 6 सेक्टरमध्ये पडझड, पण का?
हे ही वाचा : Share Market: अच्छे दिन येणार की भूकंप होणार, एप्रिल महिन्यात कसा असेल शेअर मार्केटचा मूड?