मॉर्गन स्टॅन्लेने याआधी 'ओवरवेट' दिलं होतं आता त्यावरून “इक्वलवेट” रेटिंग दिलं आहे. रेटिंग कमी दिलं असलं तरी ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राईज 73 रुपये प्रति शेअरवरून वाढेल असा दावा केला आहे. याबाबत एक निवेदन जारी केलं. सुझलॉनच्या शेअरची किंमत गेल्या सहा महिन्यांत दुप्पट झाली आहे. मॉर्गन स्टॅन्लेने जरी 'इक्वलवेट' केलं असेल तरी 88 रुपयांपर्यंत किंमत जाईल असा दावा केला.
advertisement
सुझलॉनच्या ऑर्डरबुकमध्ये झालेली वाढ आणि चांगल्या कामगिरीमुळे असल्याचं रिसर्चमधून म्हटलं आहे. कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये सुधारणा झाली आहे. कंपनीकडे पैसेही चांगले येतात. कंपनीला सगळ्यात जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत. सर्वाधिक उच्चांक त्यांनी गाठला असून 5 गीगावॅटच्या ऑर्डर सध्या कंपनीकडे आहेत.
सुझलॉन कंपनी भारतातील विंड एनर्जीच्या यशाची कहाणी संपूर्ण जगाला आपल्या या यशातून सांगत आहे. भविष्यात याच कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 ते 40 टक्क्यांनी वाढेल असा फर्मचा विश्वास आहे. रिन्यूएबल ऑर्डरिंग मजबूत असल्याने येत्या काळात म्हणजे साधारणपणे 2025-2030 या कालावधीत कंपनीला 32 गीगावॅटची नवीन ऑर्डर मिळेल.
सुझलॉन ऑर्डर घेण्यामध्ये विवेकपूर्ण आहे आणि त्यात C&I आणि कॅप्टिव्ह ग्राहकांचा मोठा वाटा आहे आणि NTPC कडून मोठ्या ऑर्डर आहेत. सुझलॉनने रेनोमचे अधिग्रहण केल्याने कंपनीला नवीन मल्टी-ब्रँड O&M व्यवसायातही आपलं वेगळं स्थान निर्माण करेल ज्यामुळे सुझलॉनच्या कमाईत भर पडेल.
ज्यांच्याकडे सुझलॉनचा शेअर आहे त्यांनी काय करावे? तर तज्ज्ञांच्या मते ज्यांच्याकडे हा शेअर आहे त्यांनी विकण्याची घाई करू नये. पाचपैकी दोन तज्ज्ञांच्या मते ज्यांच्याकडे हा शेअर नाही त्यांनी नक्की खरेदी करण्याचा विचार करावा. तीन तज्ज्ञांच्या मते ज्यांच्याकडे हा शेअर आहे त्यांनी तो विकू नये तर होल्ड करावा आणि आणखी किंमत वाढण्याची वाट पाहावी. सध्या हा शेअर विकण्याची ही योग्य वेळ नाही.
(डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे एक जोखीम आहे. इथे दिलेली माहिती ही एक्सपर्ट/ब्रोकरेज फर्मने दिलेला सल्ला आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)