आज अशाच एका फंडबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात 2000 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती होऊ शकता. या फंडने 3.5 कोटी रुपयांपर्यंत ग्राहकांना रिटर्न्स दिले आहेत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि दीर्घकालीन फायदे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी टाटा मिडकॅप ग्रोथ फंड एक उत्कृष्ट पर्याय ठरला आहे. गेल्या 30 वर्षांत या फंडाने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
advertisement
या फंडामध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये लंपसम गुंतवले, तर आज त्याची फंड व्हॅल्यू तब्बल 3.5 कोटी रुपये झाली असती! तसेच, 2000 रुपये मासिक SIP ने 2 कोटी रुपयांचा मोठे रिटर्न्स तुम्ही मिळवू शकता. फक्त तुम्हाला थोडे पेशन्स ठेवण्याची गरज आहे. एक ते तीन वर्षांपर्यंत फार रिटर्न्स मिळत नाहीत. मात्र लाँग टर्मसाठी हा प्लॅन सर्वात बेस्ट आहे.
जर 30 वर्षांपूर्वी Tata Midcap Growth Fund च्या रेग्युलर प्लॅनमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने 2000 रुपये मासिक SIP सुरू केली असती, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपयांहून अधिक झाले असते. अजूनही वेळ गेली नाही तुम्ही आताही ही गुंतवणूक सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला या प्लॅनने वर्षाला किती रिटर्न्स दिले आहेत ते आधी समजून घ्यावं लागेल.
Tata Midcap Growth Fund (Regular Plan)
महिन्याला SIP : 2000 रुपये
गुंतवणुकीचा कालावधी : 30 वर्षे
एकूण गुंतवणूक : 7,20,000 रुपये
30 वर्षांनंतर फंड व्हॅल्यू : 2,01,38,481 रुपये (2.01 कोटी)
वार्षिक रिटर्न : 17.84%
लंपसम गुंतवणुकीने दिले 3.5 कोटी
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जुलै 1994 रोजी Tata Midcap Growth Fund च्या डायरेक्ट प्लॅनमध्ये 1 लाख रुपये लंपसम गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 3.59 कोटी रुपये झाले असते. टाटा मिडकॅप ग्रोथ फंड हा एक ओपन-एंडेड इक्विटी फंड आहे जो प्रामुख्याने मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. सेबीच्या नियमांनुसार, या योजनेच्या एकूण मालमत्तेपैकी किमान 65 % रक्कम मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत, या फंडाच्या एकूण पोर्टफोलिओपैकी 94.91% गुंतवणूक इक्विटीमध्ये होती, तर 5.09 % गुंतवणूक कॅश आणि कॅश इक्विवेलेंट्स होता.
लॉन्चच्या वेळी गुंतवणूक – 1 लाख रुपये
30 वर्षांतील वार्षिक परतावा – 20.9%
30 वर्षांनंतर फंड व्हॅल्यू – 3,59,42,234 रुपये (3.59 कोटी रुपये)
फंड लाँचची तारीख – 1 जुलै 1994
फंडच्या टॉप 5 होल्डिंग्स
मुथूट फायनान्स (Muthoot Finance) – 3.30%
मॅक्स फायनान्शियल (Max Financial) – 3.20%
एल्केम लॅबोरेटरीज (Alkem Laboratories) – 3.11%
ऑरोबिंदो फार्मा (Aurobindo Pharma) – 2.95%
जुबिलंट फूडवर्क्स (Jubilant Foodworks) – 2.85%
टाटा मिडकॅप ग्रोथ फंड- एक रिस्की पण फायदेशीर गुंतवणूक
Tata Midcap Growth Fund हा हाय रिस्क, हाय रिटर्न असलेला फंड आहे, जो ‘Very High Risk’ कॅटेगरीमध्ये मोडतो. याचा अर्थ, या फंडात गुंतवणूक करताना जोखीम लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, जर दीर्घकालीन धैर्य ठेवले, तर मोठा परतावा मिळू शकतो.
डायरेक्ट प्लॅनचा एक्स्पेन्स रेशियो : 0.66%
रेग्युलर प्लॅनचा एक्स्पेन्स रेशियो : 1.87%
एकूण AUM (4 फेब्रुवारी 2025 पर्यंत) : 4,348.55 कोटी रुपये
लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
Tata Midcap Growth Fund हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा विचार करत असाल, तर हा फंड तुम्हाला मोठा परतावा देऊ शकतो. मात्र, हा एक हाय रिस्क फंड आहे, त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घ्या.
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. इक्विटी म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भविष्यात अशीच कामगिरी करतील याची खातजमा करत नाही. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)