TRENDING:

Stock: 'हे' पाच शेअर्स देतील बक्कळ नफा, सध्या किंमत 100 रुपयांपेक्षा कमी, आताच घेऊन टाका!

Last Updated:

शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असलेल्यांसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या काही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला काही तज्ज्ञांनी दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शेअर बाजारात गेल्या महिन्यात घसरण होती; मात्र डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून बाजार तेजीत आहेत. आज बाजारात थोडी घसरण झाली; मात्र छोट्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना नफा कमावून दिला. या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असलेल्यांसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या काही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला काही तज्ज्ञांनी दिला आहे. एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि हेनसेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी रिसर्च महेश एम. ओझा यांनी हा सल्ला दिला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल, हे पाहूया.
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

श्री रेणुका शुगर्स लिमिटेड

या कंपनीचा शेअर सध्या 43.25 रुपयांच्या आसपास ट्रे़ड करत आहे. त्या शेअरसाठी सुगंधा सचदेवा यांनी 46.70 रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. तसंच, 38.30 रुपयांवर स्टॉप लॉस पातळी ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

एनएचपीसी

महेश एम. ओझा यांनी एनएचपीसी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या स्टॉकची किंमत 87.89 रुपये आहे. त्याने सोमवारी कामकाजाची सुरुवात 86.94 रुपयांवर केली आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की या शेअरची किंमत 98 रुपयांवरपर्यंत जाईल. त्याच्यासाठी 63 रुपयांवर स्टॉप लॉस पातळी ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

advertisement

पीटीसी इंडिया फायनान्शियल सर्व्हिस

पीटीसी इंडिया फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या शेअरचं मूल्य सध्या 45.20 रुपयांवर आहे. त्याच्यासाठी 48 रुपये आणि 55 रुपये टार्गेट प्राइस ठेवण्यात आली आहे. तसंच, 42 रुपयांवर स्टॉप लॉस पातळी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सजिलिटी इंडिया

या कंपनीचा स्टॉक सध्या 41.41 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. त्याच्यासाठी 43.50 रुपयांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. तसंच, स्टॉप लॉस पातळी 34.70 रुपयांवर सुचवण्यात आली आहे.

advertisement

आयएफसीआय

आयएफसीआय लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला महेश एम. ओझा यांनी दिला आहे. सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीनंतर या शेअरमध्ये नरमी दिसत आहे; मात्र येणाऱ्या काळात तो चांगला रिटर्न देईल, अशी अपेक्षा आहे. सध्या या स्टॉकचं मूल्य 66.95 रुपयांवर असून, ते शेअर खरेदी करण्यासाठी उत्तम मानलं जात आहे. या स्टॉकचं मूल्य 85 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

advertisement

एकंदरीतच, सध्या या स्टॉक्सचं मूल्य 100 रुपयांपेक्षा कमी असून, आगामी काळात ते वाढेल, असा अंदाज या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यातून चांगला फायदा होऊ शकतो. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करून पाहावी.

टीप- ही माहिती केवळ संदर्भासाठी दिली असून, प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/Share Market/
Stock: 'हे' पाच शेअर्स देतील बक्कळ नफा, सध्या किंमत 100 रुपयांपेक्षा कमी, आताच घेऊन टाका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल