सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये अस्थिरता असतानाही, त्रिवेणी टरबाइनच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. आज बाजार उघडताच हा स्टॉक 539 रुपयांवर ट्रेड करत होता, पण नंतर सतत वाढत राहिला. दिवसअखेर हा शेअर 609.95 रुपयांवर बंद झाला, म्हणजेच 13.85% ची जबरदस्त वाढ!
एका दिवसात 20% चा नफा!
त्रिवेणी टरबाइनचा कालचा शेअर प्राइस 65.75 रुपये होता, आणि आज त्याने 639 रुपयांपर्यंत उच्चांक गाठला. म्हणजेच, काल गुंतवणूक केलेल्या व्यक्तीला जवळपास 20% चा नफा मिळाला. उदाहरणार्थ, जर एखाद्याने 535 रुपयांवर 100 शेअर्स खरेदी केले आणि 639 रुपयांवर विकले, तर त्याने 10,400 रुपये फक्त एका दिवसात कमावले असते!
advertisement
स्टॉकमध्ये एवढी तेजी का आली?
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील मागणी वाढत आहे. स्टीम टरबाइन्सच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्रिवेणी टरबाइनच्या व्यवसायाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षातले मागच्या तिमाहीचे निकाल खूप चांगले आले. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 503 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले, जे मागील तिमाहीच्या तुलनेत 16% अधिक आहे. त्यामुळे 35 टक्क्यांनी नफा वाढला, तर कंपनीचा नफा 93 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
त्रिवेणी टरबाइन कंपनीचं काम काय?
त्रिवेणी टरबाइन लिमिटेड ही औद्योगिक स्टीम टरबाइन उत्पादनात अग्रगण्य कंपनी आहे. ती 1 मेगावॉट ते 100 मेगावॉट क्षमतेच्या टरबाइन्स डिझाइन, उत्पादन आणि सर्विसिंग करते. तिचे उत्पादन ऊर्जा निर्मिती, साखर, सिमेंट, स्टील, केमिकल, फूड प्रोसेसिंग यांसारख्या क्षेत्रांसाठी महत्त्वाचे आहे. त्रिवेणी टरबाइन भारतासह युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथेही उत्पादने विकते. तिची स्पर्धा BHEL, Siemens, GE आणि Mitsubishi यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी आहे.
गुंतवणूकदारांसाठी पुढील संधी?
त्रिवेणी टरबाइनच्या वाढत्या व्यवसायामुळे भविष्यातही हा स्टॉक चांगले रिटर्न्स देऊ शकतो. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात वाढ होणार असल्याने स्टीम टरबाइन्सची मागणी टिकून राहील. शॉर्ट-टर्म ट्रेडर्ससाठी हा स्टॉक सध्या चांगल्या मूव्हमेंटमध्ये आहे.
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)