आरोपी नोंदणीशिवाय गुंतवणुकीचा सल्ला देत होते. फर्म अस्मिता पटेल ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (APGSOT), जितेश जेठालाल पटेल, किंग ट्रेडर्स, जेमिनी एंटरप्राइज आणि युनायटेड एंटरप्राइजेस यांच्यावरही कारवाई करण्यात आली. सेबीने या सगळ्यांना 53 कोटींहून अधिक रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
अस्मिता आणि इतर आरोपी लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देत होते. यासाठी वेगवेगळे कोर्स चालवले जात होते, ज्यासाठी लोकांकडून मोठी फी आकारली जात होती. कायदेशीर अधिकाराशिवाय हे केले जात असल्याच्या तक्रारी सेबीला मिळाल्या होत्या आणि त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. या आधारावर कारवाई करत, सेबीने सक्त कारवाई केली.
advertisement
सेबीला 42 गुंतवणूकदारांकडून तक्रारी मिळाल्या होत्या, तक्रारदारांनी असाही दावा केला आहे की अस्मिता पटेल यांनी अशा कामांमधून 140 कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. यानंतर, जेव्हा सेबीने चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना आरोप खरे असल्याचे आढळले. तपासात असेही समोर आले आहे की अस्मिता लोकांना नोकरी सोडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होती.
अस्मित पटेलची ही कंपनी मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे. तिचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. तिला 17 वर्षांचा ट्रेडिंगचा अनुभव असल्याचा दावा तिने केला. इतकंच नाही तर 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षिका म्हणून काम केल्याचंही तिने कबूल केलं. तिला पुरस्कारही मिळाला आहे. कोणतीही नोंदणी न करता गुंतवणुकीचे सल्ले दिल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.
जगभरात 1 लाखहून अधिक विद्यार्थी तिने तयार केल्याचा दावा केला आहे. तिने सांगितलेल्या स्ट्रॅटेजीमुळे लोकांना 300 टक्के रिटर्न्स मिळू शकतो असा दावाही तिने केला. तिचे युट्यूबवर सव्वा पाच लाखहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. तर इन्स्टावर 2.9 लाख फॉलोअर्स आहेत. या सगळ्यात तिचा नवऱ्याचा देखील हात असल्याची चर्चा आहे. काही लोकांकडून कोर्ससाठी फी घेतल्याचं आणि आरोपींशी निगडीत काही वस्तू सेबीने जप्त केल्या आहेत. सेबीने 6 फेब्रुवारी रोजी 53 कोटी 67 लाख रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी पतीची चौकशी सुरू आहे.