TRENDING:

एका डीलने मार्केटमध्ये फिरवला गेम, 20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरने संपूर्ण बाजाराला वेड लावले; गुंतवणूकदारांचे नशीब पालटले

Last Updated:

Share Market: इराण-अमेरिका तणावामुळे शेअर बाजार कोसळला असताना एका स्मॉलकॅप शेअरने जोरदार उसळी घेत सर्वांचे लक्ष वेधले.

advertisement
मुंबई: इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. BSE Sensex तब्बल 2700 अंकांपर्यंत घसरला, तर Nifty 50 नेही जवळपास 900 अंकांची घसरण नोंदवली. दिवसअखेर सेन्सेक्स 2496 अंकांनी घसरून 74,207 वर बंद झाला, तर निफ्टी 775 अंकांनी घसरून 23,002 वर स्थिरावला. बाजारातील बहुतांश शेअर्स लाल निशाणावर बंद झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.
News18
News18
advertisement

मात्र या मोठ्या घसरणीतही एका स्मॉलकॅप शेअरने सर्वांचे लक्ष वेधले. Jaiprakash Power Ventures (JP Power) या शेअरमध्ये दिवसाभरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. हा शेअर NSE वर 11.67 टक्क्यांनी वाढून 16.75 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका आठवड्यात या शेअरने 22 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जोरदार उसळी

या तेजीमागे महत्त्वाचे कारण म्हणजे Jaiprakash Associates (JAL) या प्रमोटर कंपनीच्या अधिग्रहणाची बातमी होय. National Company Law Tribunal (NCLT), प्रयागराज यांनी Adani Enterprises यांच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली आहे. अडाणी समूह सुमारे 14,535 कोटी रुपयांमध्ये JP Associates चे अधिग्रहण करणार आहे.

advertisement

JP Associates कडे JP Power मधील सुमारे 24 टक्के हिस्सा असल्याने या व्यवहाराचा थेट फायदा JP Power ला होणार असल्याची बाजारात चर्चा आहे. अडाणी समूहाच्या प्रवेशामुळे कंपनीला मजबूत व्यवस्थापन, भांडवल आणि संसाधने मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे JP Power बराच काळ मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली होती. अडाणी समूहाच्या आर्थिक ताकदीमुळे कंपनीचा कर्जभार कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे बँकांचा विश्वास वाढण्याबरोबरच कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

याशिवाय Adani Power चा अनुभव आणि तंत्रज्ञान JP Power च्या वीज प्रकल्पांना लाभदायक ठरू शकतो. उत्पादन खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे. अडाणी समूहाच्या कोळसा पुरवठा साखळीमुळे JP Power ला स्वस्त आणि दर्जेदार कोळसा मिळण्यास मदत होईल.

नेटवर्कचा फायदा

तसेच Adani Energy Solutions च्या ट्रान्समिशन नेटवर्कचा फायदा घेत JP Power निर्मित वीज देशभर पोहोचवू शकते. यामुळे कंपनीच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. अडाणी समूहाच्या नावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्याची शक्यता असून JP Power या शेअरकडे आता ‘पेनी स्टॉक’ऐवजी ‘ग्रोथ स्टॉक’ म्हणून पाहिले जाऊ शकते. यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदारांचे आकर्षणही वाढू शकते.

advertisement

एकीकडे संपूर्ण बाजार घसरत असताना JP Power ने दाखवलेली तेजी गुंतवणूकदारांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आणि योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
एका डीलने मार्केटमध्ये फिरवला गेम, 20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरने संपूर्ण बाजाराला वेड लावले; गुंतवणूकदारांचे नशीब पालटले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल