TRENDING:

वडिलांच्या इच्छेसाठी चक्क सोडली सरकारी नोकरी, आता विकतोय पाणीपुरी, महिन्याची कमाई पाहाच!

Last Updated:

सरकारी नोकरी कुणाला नको असते? जो तो सरकारी नोकरीच्या मागे धावत असतो. परंतु एका तरुणाने एस.बी.आय बँकेतील नोकरी सोडून वडिलांच्या इच्छेसाठी चक्क पाणीपुरीचा व्यवसाय हाती घेतला आहे.

advertisement
नाशिक : सरकारी नोकरी कुणाला नको असते? जो तो सरकारी नोकरीच्या मागे धावत असतो. मग ती साधी शिपायाची का असेना. परंतु एका तरुणाने एस.बी.आय बँकेतील नोकरी सोडून वडिलांच्या इच्छेसाठी चक्क पाणीपुरीचा व्यवसाय हाती घेतला आहे. ही गोष्ट आहे नाशिकच्या शिवा चव्हाण या तरुणाची. शिवा हा नाशिक येथील मखमला गावात वास्तव्यास आहे आणि शिवा याचा ओम गुरुदेव पाणीपुरी सेंटर हा खानदानी व्यवसाय आहे. आज या व्यवसायात त्यांच्या परिवारातील ही पाचवी पिढी काम करत आहे.
advertisement

का सोडली सरकारी नोकरी?

शिवा याने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले की, पाणीपुरी हा आमचा खानदानी व्यवसाय आहे. आज मी हा व्यवसाय पाचवी पिढी म्हणून चालवत आहे. मी या व्यवसायात येण्यापूर्वी नाशिक येथे गव्हर्मेंट एस.बी.आय या बँकेत नोकरीस होतोमला या व्यवसायात येण्याची इच्छा नसताना वडिलांसाठी मी या ठिकाणी उभा आहेअसे तो सांगतो.

advertisement

नोकरी सोडली, विकायला लागला सोडा, तीन महिन्यात तरुणाची दीड लाखाची उलाढाल

शिक्षण घेत असताना काहीतरी नवीन करूसर्व घरातले हे व्यवसाय करत आहेत. आपण कुठेतरी चांगली नोकरी शोधू या हेतूने मी पुढे जात होतोपरंतु वडिलांनी सांगितले आणि ते मी केलेयावर देखील मला आज अभिमान वाटतो. कारण आज काल जो येतो तो सरकारी नोकरी शोधत असतो. परंतु मी तिला नाकारली आहे आणि आज माझा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे याचे त्यांना देखील आनंद वाटत असतो, असं शिवा सांगतो

advertisement

मी जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा मला साधारण 22 हजार पगार हा त्यावेळी येत असे. परंतु आज मी स्वतः फक्त काहीच तास काम करून महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमाई करत आहे, असं शिवाने सांगितले.

तुम्ही देखील कुठल्याही परिस्थितीवर मात करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे प्रयत्न केल्यास नक्की आपण पुढे जाऊअसा संदेश त्याने तरुण पिढीला दिला आहे. नोकरी शोधत आपले वय वाढविण्यापेक्षा नाही काही तर स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय कराअसे तो सर्वांना सांगत असतो.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
वडिलांच्या इच्छेसाठी चक्क सोडली सरकारी नोकरी, आता विकतोय पाणीपुरी, महिन्याची कमाई पाहाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल