8 वर्षांच्या अथक परिश्रमानंतरही सरकारी नोकरी न मिळाल्याने आवटे यांनी आपले नशीब उद्योजकतेत आजमावण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी क्लासेस असलेल्या ठिकाणीच नाश्ता सेंटर सुरू केले. या हेतूमागे त्यांची दूरदृष्टी होती, कारण या परिसरात स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी असतात.
त्यांच्या नाश्ता सेंटरमध्ये दही पोहे, समोसा राईस, मटकी, शिरा यासह अनेक पदार्थ या ठिकाणी मिळतात. या नाश्ता सेंटरच्या माध्यमातून 4 ते 5 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे आवटे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. त्यांच्या नाश्ता सेंटरमध्ये 11 कामगार आहेत. त्यांना देखील कामाच्या माध्यमातून चांगला रोजगार मिळाला आहे आणि ते समाधान व्यक्त करत आहेत.
advertisement
नाश्ता सेंटर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवटे यांनी काही महत्त्वाचे मंत्र सांगितले आहेत. त्यांच्या मते या व्यवसायात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी पदार्थांची क्वालिटी चांगली ठेवणे आणि ग्राहकांशी संवाद चांगला ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा ग्राहक आपल्या पदार्थांच्या चवीने आणि वागणुकीने आकर्षित झाले की ते वारंवार आपल्याकडेच येतात.