Why Silver Price Hike: सोमवारी (२२ डिसेंबर) भारतातील चांदीच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली. जागतिक बाजारपेठेत आलेल्या तेजीच्या परिणामी भारतीय बाजारातही चांदीच्या किमती वधारल्या. देशांतर्गत बाजारात, चांदीचा दर प्रति ग्रॅम सुमारे २१९ रुपये आणि प्रति किलोग्रॅम सुमारे २.१९ लाखांवर व्यवहार होत आहे.
>> जागतिक बाजारात जोरदार तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर ३.३ टक्क्यांनी वधारत ६९.४४ डॉलर प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत चांदीच्या किमतींमध्ये सुमारे १३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदीने आतापर्यंत सोन्याच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे. अनिश्चित आर्थिक वातावरणात, गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोनं-चांदीसारख्या मौल्यवान धातूंकडे वळले आहेत.
advertisement
>> अमेरिकेच्या व्याजदर कपातीचा आणि कमकुवत डॉलरचा परिणाम
तज्ज्ञांनी म्हटले की, चांदीच्या दरात एकाकी वाढ झाली नाही. सोन्याचा दर वाढण्यास जे कारण होते, त्याच कारणांनी चांदीचा दरदेखील वाढला. यूएस फेडरल रिझर्व्हकडून आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा, भू-राजकीय जोखीम आणि कमकुवत डॉलर अशा कारणांनी चांदीच्या दरावर परिणाम केला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
फेडरल रिझर्व्हने या वर्षी तीन वेळा २५ बेसिस पॉइंट्सने दर कपात केली आहे. तर अमेरिकेतील महागाईच्या मंद आकडेवारीमुळे (किंवा वर्षभरात सीपीआयमध्ये घट) पुढील वर्षी आणखी दर कपात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीसारख्या व्याज नसलेल्या घटकांची मागणी वाढली आहे.
>> पुरवठ्यातील कमतरता आणि गुंतवणूकीची वाढती मागणी
मार्केट एक्सपर्टने म्हटले की, मजबूत गुंतवणूक प्रवाह आणि सततच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे चांदीची उपलब्धता आणखी मर्यादित झाली आहे. औद्योगिक मागणी देखील मजबूत आहे.
गुंतवणूक आणि औद्योगिक धातू म्हणून या दुहेरी भूमिकेमुळे या तेजीत चांदीने सोन्याला मागे टाकले आहे. मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष आणि कमोडिटीज राहुल कलंत्री म्हणाले की, आठवड्याच्या सुरुवातीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यांच्या मते, २५ बेसिस पॉइंट्सच्या दरवाढी असूनही, बँक ऑफ जपानच्या अपेक्षेपेक्षा कमी आक्रमक भूमिकेने चांदीसारख्या धातूंन पाठिंबा दिला.
>> तांत्रिक पातळीवर काय आहे?
हंगामी ट्रेंड देखील चांदीच्या बाजूने आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, डिसेंबर हा महिना सामान्यतः सोने आणि चांदीसाठी सकारात्मक परतावांचा महिना मानला जातो, ज्यामुळे हंगामी आधारावरही तेजीला पाठिंबा मिळाला आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये कमी प्रमाणात विक्री झाल्यामुळे तीव्र तेजीनंतर नफा वसुली होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एक्सपर्टने म्हटले.
तांत्रिकदृष्ट्या ६६.४० डॉलर-६५.७५ डॉलर प्रति औंस या दरम्यानचा दर हा आधार मानला जात आहे. तर, ६७.२० डॉलर ते ६८ डॉलर प्रति औंस या दराची पातळी ही रेझिस्टन्स पातळी समजली जाते.
