SIP म्हणजे काय?
SIP (Systematic Investment Plan) म्हणजे नियोजित गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग समजला जातो. यामध्ये ठरावीक रक्कम तुम्ही महिन्याला, तीन महिन्याला किंवा सहा महिन्यांतून एकदा एका ठराविक तारखेला म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकता. SIP मधून लहान रकमेपासून सुरुवात करून दीर्घकाळात मोठा निधी निर्माण करता येतो. काही फंड तर असे आहेत जे 100 रुपये किंवा 500 रुपयांपासून SIP करण्याची परवानगी देतात. तुम्ही 1 वर्षापासून ते 5, 10, 15 वर्षांपर्यंत फंडमध्ये पैसे ठेवू शकता. यातून मिळणारा रिटर्न हा मार्केटवर डिपेंड असतो, त्यामुळे रिस्कही खूप मोठी असते.
advertisement
HDFC Mutual Fund Scheme: 2000 रुपये गुंतवून मिळवा 2.12 कोटी, SIP चा जबरदस्त प्लॅन करेल श्रीमंत
स्टेप-अप SIP म्हणजे काय?
स्टेप-अप SIP म्हणजे तुमच्या SIP रकमेची दरवर्षी वाढ करता. तुम्ही SIP सुरू केल्यानंतर पुढच्या वर्षात 10, 20, 30 टक्के तुम्हाला किती टक्के वाढ करायची हे अप्लाय करताना सांगावं लागतं. तुम्ही म्युच्युअल फंड एक वर्षानंतरही स्टेपअप करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याला 5,000 SIP करत असाल, तर स्टेप-अप SIP च्या माध्यमातून तुम्ही ती रक्कम दरवर्षी 10-20% ने वाढवू शकता.
गुंतवणूक कशी करावी?
- योग्य म्युच्युअल फंड निवडा: त्यासाठी मार्केटमध्ये कोणती कंपनी किती रिटर्न देते ते पाहावं, लाँग टर्म SIP जास्त रिटर्न देते, जी SIP १ वर्ष रिटर्न देणारी आहे त्यात रिस्कही असते. मात्र 2 किंवा 3 वर्षाचे रिटर्न्स हे 1 वर्षाच्या तुलनेत जास्त मिळतात.
- SIP प्रकार निवडा: तुमच्या गरजेनुसार सामान्य SIP किंवा स्टेप-अप SIP निवडा.
- तुमच्या बजेटनुसार मासिक SIP रक्कम निश्चित करा.
- SIP साठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा फंड हाऊसद्वारे अर्ज करा.
- ई-नॅच किंवा ECS सेटअप: बँक खात्यातून रक्कम आपोआप कापली जाईल.
Mutual Fund: रोज 20 रुपयांचा जुगाड अन् खात्यावर जमा होतील 34 लाख, समजून घ्या गणित
SIP (Systematic Investment Plan) चे फायदे:
- आर्थिक शिस्त: SIP तुम्हाला नियमित गुंतवणुकीची सवय लावते.
- रुपया कॉस्ट अॅव्हरेजिंग: बाजारातील चढ-उतारांमध्येही गुंतवणूक सुरक्षित राहते.
- कंपाउंडिंगचा फायदा: लांब कालावधीसाठी मोठा निधी तयार होतो.
- लवचिकता: कोणत्याही वेळी SIP रक्कम कमी-जास्त करू शकता.
- टॅक्स फायदे: ELSS फंडांमध्ये SIP केल्यास 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळते.
SIP चे प्रकार:
- सामान्य SIP: ठरावीक रक्कम मासिक स्वरूपात गुंतवते.
- स्टेप-अप SIP: रक्कम दरवर्षी वाढवण्याचा पर्याय.
- फ्लेक्स SIP: तुम्हाला महिन्यानुसार रक्कम बदलण्याची सुविधा मिळते.
- परफॉर्मन्स-आधारित SIP: फंडाच्या कामगिरीवर आधारित गुंतवणूक.
SIP हा सुरक्षित आणि सोपा गुंतवणुकीचा मार्ग आहे. स्टेप-अप SIP च्या माध्यमातून तुमच्या उत्पन्नवाढीचा फायदा घेऊन मोठा निधी निर्माण करू शकता. आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य SIP निवडून दीर्घकालीन फायदे मिळवा.