Mutual Funds च्या नियमांमध्ये झाले मोठे बदल, SEBI चे नवे नियम घ्या जाणून

Last Updated:

Mutual Funds: SEBI ने कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटले आहे की, 'म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट' (MITR) नावाचा प्रस्तावित सेवा मंच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) तयार करेल.

म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड
Mutual Funds: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी आहे. गुंतवणूकदारांना आता म्युच्युअल फंड अकाउंट सहजपणे शोधता येणार आहेत. जी दीर्घकाळापासून बंद आहेत. खरं तर, कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबीने गुंतवणूकदारांसाठी निष्क्रिय आणि दावा न केलेले म्युच्युअल फंड फोलिओ शोधण्यासाठी सर्व्हिस प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
कोण तयार करेल सर्व्हिस प्लॅटफॉर्म?
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने आपल्या कंसल्टेशन पेपरमध्ये म्हटले आहे की 'म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट' (MITR) नावाचा प्रस्तावित सेवा मंच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) तयार करेल.
advertisement
काय फायदा होईल?
प्रस्तावित प्लॅटफॉर्म गुंतवणुकदारांना विसरलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकी शोधण्यासाठी, विद्यमान मानकांनुसार KYC अपडेट करण्यासाठी आणि फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षा उपाय समाविष्ट करण्यास प्रोत्साहित करेल. यासह, हे व्यासपीठ दावा न केलेले म्युच्युअल फंड फोलिओ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि पारदर्शक आर्थिक परिसंस्था निर्माण करण्यात योगदान देईल.
विसरलेली म्युच्युअल फंड गुंतवणूक शोधण्यात मदत होईल
सेबीने सांगितले की, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार कधीकधी त्यांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवू शकत नाहीत. याचे कारण असे असू शकते की किमान केवायसी डिटेल्ससह ही गुंतवणूक फिजिकल स्वरूपात केली गेली होती.
advertisement
ओपन-एंडेड ग्रोथ ऑप्शनसह म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक जोपर्यंत गुंतवणूकदार, त्याचे नॉमिनी किंवा कायदेशीर वारस संबंधित ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) कडे पूर्तता किंवा हस्तांतरणासाठी संपर्क करत नाही तोपर्यंत गुंतवणूक राहू शकते. पॅन, ईमेल आयडी किंवा व्हॅलिड पत्त्याच्या अनुपलब्धतेमुळे, हे MF फोलिओ युनिटधारकाच्या एकत्रित खाते विवरणामध्ये दिसत नसण्याची देखील शक्यता आहे. अशा प्रकारे ही म्युच्युअल फंड खाती निष्क्रिय होतात आणि फसवणूक करुन पैसे काढून घेण्याच्या हिशोबाने खूपच संवेदनशील होतात.
advertisement
ही चिंता दूर करण्यासाठी, SEBI ने RTA द्वारे हे सेवा मंच तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे व्यासपीठ दोन पात्र RTAs द्वारे संयुक्तपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते. ComputerAge Management Services Limited (CAMS) आणि KFin Technologies Limited. सेबीने या प्रस्तावावर 7 जानेवारीपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
मराठी बातम्या/मनी/
Mutual Funds च्या नियमांमध्ये झाले मोठे बदल, SEBI चे नवे नियम घ्या जाणून
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement