चार लेकरांची आई प्रेमात पडली, तरूणासोबत पळाली, नगरमध्ये पुढे जे घडलं पाहून सगळेच हादरले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
फेसबुकवरून ओळख वाढवून प्रेम आणि लग्नाचे खोटे आश्वासन देत एका 33 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्यानंतर तरूण पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर : सोशल मीडियावरुन मैत्री करुन फसवण्याचे अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत. सोशल मीडियावरील हे नातेसंबंध किती घातक ठरू शकतात,याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. फेसबुकवरून ओळख वाढवून प्रेम आणि लग्नाचे खोटे आश्वासन देत एका 33 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्यानंतर तरूण पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ,राजू भाऊराव काकडे उर्फ सुनील पटेल असे जालना जिल्ह्यातील आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित महिलेने कोतवाली ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेची आरोपीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. फेसबुकवर झालेली ओळख पुढे प्रेमसंबधापर्यंत गेली. आरोपी तरूण हा महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही,आपण लग्न करू असे म्हणत महिलेचा विश्वास संपादन केला आहे.
advertisement
लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप
पीडित महिला विवाहित असून तिला चार मुले आहेत. 1 फेब्रुवारी रोजी रात्री आरोपी तरुणाने अहिल्यानगर येथे आल्याचे सांगून महिलेला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर दुचाकीवरून तिला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. तेथे एका लॉजमध्ये मुक्काम करत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
advertisement
चहा आणतो म्हणून गेला...
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ‘चहा आणतो’ असे सांगून आरोपी महिलेचा मोबाईल घेऊन बाहेर गेला आणि पुन्हा परतलाच नाही. बराच वेळ वाट पाहूनही त्याच्याशी संपर्क न झाल्याने घाबरलेल्या महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, महिलेच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
advertisement
नागरिकांनी अधिक सतर्क राहाण्याचे आवाहन
कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेला ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता, प्रेम व लग्नाचे खोटे आश्वासन देत फसवणूक व अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार राजू काकडे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या आभासी नात्यांमधील धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 4:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चार लेकरांची आई प्रेमात पडली, तरूणासोबत पळाली, नगरमध्ये पुढे जे घडलं पाहून सगळेच हादरले










