advertisement

T20 World Cup : टीम इंडियामध्ये शेवटच्या क्षणी बदल, स्टार खेळाडूला तातडीने मुंबईत बोलावलं, संघासोबत प्रवास करणार!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायला फक्त 24 तासांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियामध्ये शेवटच्या क्षणी बदल होणार आहे.
1/7
टीम इंडियाचा फास्ट बॉलर हर्षित राणाला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजची टीममध्ये निवड होणार आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

2/7
7 फेब्रुवारीला वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे, त्याआधी मोहम्मद सिराज आज मुंबईला जाणार असल्याचं समोर आलं आहे. मोहम्मद सिराज हा 2024 च्या भारताच्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता.

3/7
बुधवारी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळला, त्यावेळी हर्षित राणाला दुखापत झाली. राणाने एका ओव्हरमध्ये दोन वेळा रन अप घेतला पण तो मध्येच थांबला, यानंतर तो गुडघा धरून मैदानाबाहेर गेला. एका ओव्हरमध्ये हर्षितने 16 रन दिल्या.

4/7
'हर्षित राणाला अजून टीमबाहेर करण्यात आलेले नाही, फिजिओ त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, पण मैदानाबाहेर जाताना तो चांगला वाटला नाही', असं कर्णधार सूर्यकुमार यादवने मॅच आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

5/7
'मागच्या एक दोन वर्षात दुसऱ्या कोणत्या फास्ट बॉलरने चांगली कामगिरी केली आहे का? किंवा कोणता असा बॉलर आहे का जो चांगली बॅटिंग करू शकतो, हे आम्ही पाहू', असं सूर्या म्हणाला.

6/7
'दुसरा खेळाडू बॅटिंग करणारा पाहिजे, असा नियम नाही, कारण नवव्या किंवा दहाव्या क्रमांकावर तुम्ही खेळाडूकडून सिक्स मारण्याची अपेक्षा करत असाल, तर इतर आठ खेळाडू काय करत आहेत? आम्ही पाहू आमच्याकडे पर्याय आहेत, त्यातला सर्वोत्तम पर्याय निवडू', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.

7/7
वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियासमोर फिटनेसमुळे संकट ओढावलं आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळता आलं नव्हतं. टी-20 वर्ल्ड कपसाठी सुंदर फिट होईल, अशी अपेक्षा आहे. तर तिलक वर्माही दुखापतीनंतर कमबॅक करत आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement