Govinda: सुपरस्टार गोविंदाचं दिवाळं निघालं, घरही ठेवलंय गहाण; पैशांसाठी करतोय नको ते काम, मॅनेजरचा मोठा खुलासा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
गोविंदा आर्थिक दृष्ट्या डबघाईला गेल्याचं बोललं जात आहे. एका कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये अभिनेता डान्स करताना स्पॉट झाला आहे. सध्या अभिनेत्याच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा अहुजा चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला गोविंदा त्याच्या वैवाहिक जीवनामुळे अडचणीत असल्याचं बोललं जात आहे. अनेकदा आमच्यामध्ये सर्व काही आलबेल असल्याचंही सुनिता आणि गोविंदाकडून बोलण्यातही आलेलं आहे. आता अशातच सध्या असं बोललं जात आहे की, गोविंदा आर्थिक दृष्ट्या डबघाईला गेल्याचं बोललं जात आहे. एका कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये अभिनेता डान्स करताना स्पॉट झाला आहे. सध्या अभिनेत्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सर्व प्रकरणावर अभिनेत्याच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे. नेमका अभिनेत्याचा मॅनेजर काय म्हणाला? जाणून घेऊया...
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आर्थिक दृष्ट्या दिवाळखोरीमध्ये गेल्याच्या चर्चा सुरू आहे. कारण की, तो काही खासगी कार्यक्रमामध्ये आणि एका कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अभिनेता डान्स करताना दिसला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये गोविंदा दिवाळखोरीमध्ये गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याला पैशांची गरज असल्याने तो अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करत असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्याच्या मॅनेजरने दिली आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा याने आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याच्या मॅनेजरने गोविंदाच्या दिवाळखोरीच्या अफवांना अफवा असल्याचे म्हणत चर्चा फेटाळले आहेत. सोबतच अभिनेत्याच्या मॅनेजरने अभिनेता एकेकाळी आर्थिक अडचणीमध्ये सापडला होता, असं म्हटलं आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्याने स्वतःचं राहतं घर गहाण ठेवून कर्ज फेडलेलं. पण, आता अभिनेत्यानं ते कर्जही पूर्णपणे फेडल्याचं मॅनेजरनं सांगितलं.
advertisement
अलीकडेच, गोविंदाचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये तो उत्तर प्रदेशातील एका साध्या टॅक्सीमध्ये जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एकेकाळी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ चालवणारा सेलिब्रिटी आता साधी सिंपल कार वापरत आहे, गोविंदाची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे, अशी कमेंट अनेक युजर्स करत आहे. या सर्व प्रकरणावर एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेवर गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा म्हणतो की, " गोविंदा यांच्याजवळ फक्त एकच नाही तर, बऱ्याच कार्स आहेत. तो दिवाळखोरीमध्ये आहे आणि भीक मागतोय, असं मत व्यक्त करणं पूर्णपणे मूर्खपणाचं आहे. परफॉर्म करणं त्याचं प्रोफेशन आहे. त्याचा अर्थ असा नाही की, अभिनेता दिवाळखोरीमध्ये गेला आहे."
advertisement
इतने बड़े Star का इतना तगड़ा Downfall कैसे आ सकता है?
गोविंदा कहीं जा रहे हैं और उन्हें Aura गाड़ी लेने आई है। ये बंदा कभी Mercedes, Audi और BMW से उतरता नहीं था और आज एक साधारण Aura टैक्सी में।
गांवों और गलियों में परफॉर्मेंस से लेकर Aura तक 💔 pic.twitter.com/T4CU1eG9x9
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) January 29, 2026
advertisement
गोविंदाच्या मॅनेजरने पुढे सांगितले की, "त्यावेळी एअरपोर्टच्या आत आणण्यासाठी खासगी वाहनांना परवानगी नव्हती. आता ते त्यांच्या परिवाराची काळजी नाही घेणार, मग कोण काळजी घेणार? ते कायमच त्यांच्या पत्नीची आणि मुलांची काळजी घेत असतात. गोविंदा यांनी जरीही काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम केले नसले तरीही ते केवळ इव्हेंट्स आणि डान्स परफॉर्मन्स नाही, तर फिल्म्ससाठीही खूप डिमांडमध्ये असतो. गोविंदाने करोडो रुपयांच्या ऑफर्स नाकारल्या असल्याचा मी साक्षीदार आहे. स्क्रीप्ट आवडलं नाही हे ठीक आहे, पण तो पहिला अभिनेता आहे, ज्याचा चित्रपट हिट नाही, तरीही मोठे निर्माते आणि अभिनेते अजूनही त्याचा पाठलाग करत आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यानं काम करणं थांबवलंय. तुम्हाला लवकरच एक मोठी घोषणा ऐकायला मिळेल..."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 4:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda: सुपरस्टार गोविंदाचं दिवाळं निघालं, घरही ठेवलंय गहाण; पैशांसाठी करतोय नको ते काम, मॅनेजरचा मोठा खुलासा









