SBI Alert! ऑनलाइन बनावट गुंतवणूक योजनांपासून रहा सावध, पहा कशी होते फसवणूक

Last Updated:

SBI Alerts Fake Investment Schemes: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना खोट्या गुंतवणूक योजनांना बळी पडू नका असा इशारा दिला आहे. डीपफेक व्हिडिओंबाबतही इशारा देण्यात आला आहे.

एसबीआय
एसबीआय
SBI Alerts Fake Investment Schemes: वेळेनुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात. यातील सर्वात महत्त्वाचे बदल ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संबंधित आहेत. तंत्रज्ञानाच्या ट्रेंडमुळे अनेक कामे घरी बसून करणे सोपे झाले आहे. परंतु अशा परिस्थितीत डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. लोकांसाठी त्यांचे बँक अकाउंट स्कॅमर्सपासून सुरक्षित ठेवणे कठीण होत आहे, कारण ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि त्यांच्याशी संबंधित नवीन ट्रिकही येत आहेत.
टेक्नॉलॉजीचा वाढता वापर स्टेट बँक ऑफ इंडियालाही चिंतेत टाकत आहे. अशा परिस्थितीत, बँकेने आपल्या ग्राहकांना आणि सामान्य लोकांना आपल्या ग्राहकांना आणि सामान्य जनतेला टॉप मॅनेजमेंटला चुकीच्या पद्धतीने दाखवणार्या डीपफेक व्हिडिओंबद्दल इशारा दिला आहे. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने X अकाउंटवर सार्वजनिक सावधगिरीचा इशारा जारी केला आहे.
advertisement
खरंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडिया ॲप X वरील आपल्या अधिकृत खात्यातून बनावट व्हिडिओ म्हणजेच डीपफेक व्हिडिओंबद्दल चेतावणी दिली आहे. गुंतवणूक योजना असल्याचा दावा करणाऱ्या अशा डीपफेक व्हिडिओंपासून लोकांना दूर राहावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. बँकेकडून अशी कोणतीही गुंतवणूक योजना ऑफर केली जात नाही ज्यामध्ये जास्त रिटर्न मिळत असेल. बँकेने स्पष्ट केले आहे की, ते जास्त परताव्याच्या दाव्यासह कोणतीही योजना देत नाही. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना डीपफेक व्हिडिओंपासून दूर राहावे लागेल.
advertisement
डीपफेक व्हिडिओ कसे ओळखायचे?
डीपफेक व्हिडिओ ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. ज्यासाठी AI ची मदत घेतली जात आहे. हा व्हिडीओ खरा वाटतो पण नीट लक्ष देऊन पाहिल्यास व्हिडीओमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केलेला दिसतो आणि चेहरा आणि आवाजात थोडासा बदल दिसून येतो. व्हिडिओ जरा काळजीपूर्वक पाहिल्यास व्हिडिओ डीपफेक आहे की नाही हे ओळखणे सोपे होईल.
मराठी बातम्या/मनी/
SBI Alert! ऑनलाइन बनावट गुंतवणूक योजनांपासून रहा सावध, पहा कशी होते फसवणूक
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement