WhatsApp आणणार जबरदस्त फीचर! प्रत्येकाला दिसणार नाही तुमचं स्टेटस
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp New Feature: तुमचं स्टेटस हे सर्वांनाच दिसू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी व्हॉट्सअॅप एक खास फीचर आणणार आहे. हे फीचर नेमकं काय आहे जाणून घेऊया...
नवी दिल्ली : इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वेळोवेळी नवनवीन फीचर आणत असते. आत व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी एक भारी फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे. ज्यामुळे स्टेटस शेअर करणे पहिल्यापेक्षा जास्त पर्सनल आणि सोपं होईल. रिपोर्टनुसार कंपनी क्लोज फ्रेंड्स नावाने एक नवीन ऑप्शन स्टेसट अपडेट्स करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
आतापर्यंत, व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट करताना, यूझर्सना ते त्यांच्या सर्व कॉन्टॅक्ट्सह शेअर करावे लागत होते किंवा त्यांची प्रायव्हसी सेटिंग्ज वारंवार बदलावी लागत होती. परंतु या नवीन फीचरसह, तुम्ही तुमचे स्टेटस फक्त निवडक लोकांसह शेअर करू शकता, म्हणजेच फक्त ज्यांना तुम्ही जवळचे समजता तेच तुमचे फोटो किंवा मेसेज पाहू शकतील.
advertisement
advertisement
व्हॉट्सअॅपमध्ये फ्लेक्सिबिलिटी देखील आहे. यूझर्स स्टेटस प्रायव्हसी सेटिंग्जद्वारे किंवा स्टेटस पोस्ट करताना थेट त्यांच्या जवळच्या मित्रांची लिस्ट मॅनेज करू शकतात. तुम्ही कधीही यादीतून कोणालाही जोडू किंवा काढून टाकू शकता. तसंच, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एकदा एखाद्याने स्टेटस पाहिले की, नंतर त्यांना लिस्टमधून काढून टाकले तरीही ते व्यू परत घेता येत नाही.
advertisement
advertisement
कंपनी कस्टम कॉन्टॅक्ट लिस्टवरही काम करत आहे. व्हॉट्सअॅप कस्टम कॉन्टॅक्ट लिस्टवरही काम करत आहे, जिथे यूझर कुटुंब, कामाचे मित्र किंवा इतर कोणत्याही नावाने (इमोजीसह देखील) वेगळे ग्रुप तयार करू शकतील. हे फीचर सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि सर्व यूझर्ससाठी उपलब्ध नाही. या फीचरची अधिकृत लाँच तारीख समोर आलेली नाही.










