महापालिकेला झटका, आव्हाडांनी राजकीय डाव टाकला, नजीब मुल्लांना ताकद, विधानसभेचा रस्ता मोकळा!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आम्ही एकत्र आलो तर अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता असेल, असे सूचक वक्तव्य शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख मनोज प्रधान यांनी केले.
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेत अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगणार असल्याचे सूचक वक्तव्य मनोज प्रधान यांनी केले. या खेळीमागे जितेंद्र आव्हाड यांची रणनीती असल्याचे कळते. विधानसभा निवडणूक सोपी जाण्यासाठी नजीब मुल्ला यांना ताकद देण्याची खेळी आव्हाड यांनी खेळल्याची चर्चा आहे.
आम्ही एकत्र आलो तर अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता असेल, असे सूचक वक्तव्य शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख मनोज प्रधान यांनी केले. मनोज प्रधान यांच्या या वक्तव्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गणित जुळवून राष्ट्रवादी एकत्र
ठाण्यात महायुतीला मिळालेल्या बहुमतानुसार विरोधी पक्ष नेता बसवणे एक पक्षाला शक्य नव्हते. यामुळे दोन पक्ष एकत्रित आले तरच विरोधी पक्ष नेता होऊ शकतो. हे गणित जुळवून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १२ नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९ नगरसेवक एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या खेळीमागे जितेंद्र आव्हाड यांची रणनीती असल्याची चर्चा आहे.
advertisement
जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय खेळीमागचे कारण काय?
मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडा यांना विधानसभेला मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र पालिका निवडणुकीत आव्हाडांना मुंब्रा कळवा भागात मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर आव्हाडांनी त्यांचे जुने सहकारी नजीब मुल्ला यांना विरोधी पक्ष नेते पद दिले तर मुंब्रा कौसा भागात आव्हाडांची ताकद पुन्हा वाढेल आणि आगामी विधानसभेला त्यांना निवडणूक जड जाणार नाही, अशी यामागची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 8:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापालिकेला झटका, आव्हाडांनी राजकीय डाव टाकला, नजीब मुल्लांना ताकद, विधानसभेचा रस्ता मोकळा!










