advertisement

IND vs ENG : इंग्लंडकडून 'दुगना लगान वसूल'! भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला, वैभव-आयुश ठरले विजयाचे हिरो

Last Updated:

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 311 धावात ऑल आऊट करून हा सामना 100 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने जिंकला आहे. भारताचा हा सहावा वर्ल्ड कप विजय ठरला आहे.

News18
News18
India u19 vs England U19 : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 311 धावात ऑल आऊट करून सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकरवर नाव कोरले आहे. भारताने दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड 311 वर ऑल आऊट झाली त्यामुळे भारताने हा सामना 100 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने जिंकला आहे. भारताचा हा सहावा वर्ल्ड कप विजय ठरला आहे.
भारताने इंग्लंडसमोर 412 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. इंग्लंडकडून बेन डॉकिन्स आणि जोसेफ मुरस सलामीला उतरले होते.पण जोसेफ 17 धावांवर स्वस्तात बाद झाला.त्याच्यानंतर बेन मेयेस मैदानात आला.त्याच्याकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तो अवघ्या 45 धावांची खेळी करून बाद झाला. त्याच्यानंतर थॉमस रीव्यू मैदानात आला, पण तो देखील 31 वर बाद झाला.
advertisement
एकीकडे एकामागून एक विकेट पडत असताना तिकडे वेन डावकिन्सने एकट्याने इंग्लंडचा डाव सावरला होता. बेन 66 धावांवर खेळत होता आणि तो शतक ठोकेल असे वाटत होते. पण तो देखील बाद झाला. तो बाद झाल्यानंतर विकेटची रांगच लागली होती. पण नंतर सेलेब फॉल्कनरने इंग्लंडचा डाव सावरत अर्धशतकीय खेळी केली होती.त्याच्यानंतर त्याने पुढे धावा करत शतक ठोकले होते. त्यानंतर तो 115 धावांवर आऊट झाला आणि इथेच संपूर्ण मॅच फिरली आणि भारताने इंग्लंडला 311 धावांवर ऑल आऊट करत हा सामना 100 धावांनी जिंकला आहे. तसेच या विजयासह भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले होते.
advertisement
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये 411 धावा ठोकल्या होत्या. वैभव सूर्यवंशीने 80 बॉलमध्ये 175 धावांचा दीड शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले होते.यासोबत आयुश म्हात्रेची 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या दोघांसह शेवटच्या क्षणी कनिश्क चौहाने 20 बॉलमध्ये 70 धावांची ताबडतोब खेळी करून भारताला 411 धावांपर्यंत पोहोचवले होते.
advertisement
दरम्यान इंग्लंडकडून जेम्स मिंटोने सर्वाधिक 3 तर सेबस्टीअन मॉरगन आणि अॅलेक्स ग्रीनने प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या.त्यासोबत मॅना लम्सडेनने एक विकेट काढली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : इंग्लंडकडून 'दुगना लगान वसूल'! भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला, वैभव-आयुश ठरले विजयाचे हिरो
Next Article
advertisement
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement