advertisement

Pankaj Tripathi News: "कलाकार आहोत, कुठले प्रोडक्ट नाही..." अरिजीतच्या निवृत्तीवर पंकज त्रिपाठीची प्रतिक्रिया

Last Updated:

अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बॉलिवूड गायक आणि सेलिब्रिटी सुद्धा प्रतिक्रिया देताना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने एका मुलाखतीमध्ये अरिजीतच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaj Tripathi News: "कलाकार आहोत, कुठले प्रोडक्ट नाही..." अरिजीतच्या निवृत्तीवर पंकज त्रिपाठीची प्रतिक्रिया
Pankaj Tripathi News: "कलाकार आहोत, कुठले प्रोडक्ट नाही..." अरिजीतच्या निवृत्तीवर पंकज त्रिपाठीची प्रतिक्रिया
प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंहने (Arijit Singh) अचानक पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. अरिजीतने गायनातून निवृत्तीची घोषणा करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेक सिंगर्सलाही या बातमीने धक्का मिळाला आहे. दरम्यान, अरिजीतने 27 जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यानं प्लेबॅक सिगिंगमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बॉलिवूड अभिनेतेही प्रतिक्रिया देताना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने एका मुलाखतीमध्ये अरिजीतच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने एनडीटीव्हीसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली की, "अरिजित सिंग आणि झाकीर खान यांनी करियरमध्ये घेतलेल्या ब्रेकला माझं समर्थन आहे. आपल्या करियरमध्ये कुठेतरी मानसिक आरोग्यासाठी ब्रेक घेणं आवश्यक आहेत. स्वत:ला पुन्हा जिवंत करण्यासाठी तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे. वारंवार ब्रेक घेणे किंवा तुमच्या कामाची गती कमी करणे महत्वाचे आहे, कारण कलाकार असणे हे एक आव्हानात्मक काम आहे. तरच एक कलाकार काहीतरी नवीन तयार करू शकेल. आपण काही फॅक्टरी प्रोडक्ट नाहीत. आम्ही त्या हजारो माचिस बॉक्ससारखे नाही, ज्यांना कारखान्यामध्ये दररोज बनवले जाते. "
advertisement
"आम्ही कलाकार आहोत, कुठले प्रोडक्ट नाही... खूप धावपळ करावी लागते. प्रत्येक अभिनेत्याला एका यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि बऱ्याच गोष्टींचा त्यागही करावा लागतो. कलाकाराला शुटिंगवर जाण्यासाठी कायमच एनर्जेटिक राहायला हवं. त्या उत्साहाचं कारण वेळोवेळी बदलत राहतं. ", मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठीने दिलेली प्रतिक्रिया खूपच चर्चेत राहिलेली आहे. सध्या पंकज त्रिपाठी 'मिर्झापूर: द फिल्म'मुळे कमालीचा चर्चेत आला आहे. नुकतंच या चित्रपटाची शुटिंग आटोपली असून निर्मात्यांकडून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pankaj Tripathi News: "कलाकार आहोत, कुठले प्रोडक्ट नाही..." अरिजीतच्या निवृत्तीवर पंकज त्रिपाठीची प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement