advertisement

'तो माझ्या भावासारखा', एकीकडे लग्नाच्या चर्चा, दुसरीकडे धनुषबद्दल मृणाल ठाकूरचं शॉकिंग स्टेटमेंट, हे काय बोलून गेली अभिनेत्री?

Last Updated:
Mrunal Thakur: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचं लग्न.
1/9
बॉलिवूडपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे.

2/9
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचं लग्न.

3/9
इतकंच नाही, तर हे दोघे १४ फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधणार असल्याच्या बातम्यांनी इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आता या सर्व प्रकरणावर मृणालच्या नावाने एक खळबळजनक पत्र व्हायरल होत आहे.

4/9
मृणाल ठाकूरच्या एका फॅन पेजवरून हे लांबलचक स्टेटमेंट शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये मृणालच्या हवाल्याने म्हटलंय की,
मृणाल ठाकूरच्या एका फॅन पेजवरून हे लांबलचक स्टेटमेंट शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये मृणालच्या हवाल्याने म्हटलंय की, "माझं काम ही माझी ओळख असावी, गॉसिप नाही. धनुष माझ्यासाठी नेहमीच भावासारखा राहिला आहे. आमचं नातं केवळ व्यावसायिक आणि आदराचं आहे. तरीही लोक एका स्त्रीच्या खाजगी आयुष्याबद्दल अशा वावड्या का उठवतात, याचं मला आश्चर्य वाटतं."
advertisement
5/9
या पत्रात पुढे असंही लिहिलंय की, मृणालने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि तिच्या या प्रवासाला केवळ एका अफवेचं रूप देणं चुकीचं आहे. सोशल मीडियावर या पत्राची जोरदार चर्चा सुरू झाली आणि चाहत्यांना वाटलं की मृणालने अखेर आपलं नातं स्पष्ट केलं आहे.

6/9
पण पडताळणीअंती असं समोर आलं आहे की, मृणाल ठाकूर किंवा तिच्या टीमने असं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही. मृणालच्या इन्स्टाग्राम किंवा 'X' अकाउंटवर असं कोणतंही पत्र उपलब्ध नाही.

7/9
मृणालच्या टीमने हे स्पष्ट केलं आहे की, हे व्हायरल होणारं पत्र पूर्णपणे बनावट आहे. म्हणजेच, धनुषला 'भाऊ' म्हणणारं ते विधान मृणालचं नाहीच.

8/9
लग्नाच्या चर्चांवर मृणालने यापूर्वी एका मुलाखतीत अत्यंत मजेशीर उत्तर दिलं होतं. जेव्हा तिला विचारलं की १४ फेब्रुवारीला तुमचं लग्न आहे का? तेव्हा ती हसून म्हणाली,
लग्नाच्या चर्चांवर मृणालने यापूर्वी एका मुलाखतीत अत्यंत मजेशीर उत्तर दिलं होतं. जेव्हा तिला विचारलं की १४ फेब्रुवारीला तुमचं लग्न आहे का? तेव्हा ती हसून म्हणाली, "अरेच्चा! लग्नाची तारीख पण ठरली? मला तर कोणी आमंत्रणच दिलं नाही. मला तरी लग्नाला बोलवा!" तिच्या या उत्तरावरून हे स्पष्ट होतं की लग्नाच्या बातम्या केवळ अफवा आहेत.
advertisement
9/9
अफवांच्या जगात अडकण्यापेक्षा मृणाल सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. २० फेब्रुवारीला तिचा नवा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. याशिवाय आदिवी शेषसोबतचा तिचा 'डकैत' हा चित्रपटही पाइपलाइनमध्ये आहे.

Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement