advertisement

कात्रज–कोंढवा रस्त्याचे होणार काम, भूसंपादन शेवटच्या टप्प्यात, कसा आहे 710 कोटींचा मार्ग?

Last Updated:

कात्रज–कोंढवा रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया आता जवळपास पूर्ण होत आली आहे. 50 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठीचे भूसंपादन येत्या 15 दिवसांत पूर्ण होणार असून, त्यानंतर 15 मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

कात्रज–कोंढवा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात; भूसंपादन शेवटच्या टप्प्यात
कात्रज–कोंढवा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात; भूसंपादन शेवटच्या टप्प्यात
पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कात्रज–कोंढवा रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया आता जवळपास पूर्ण होत आली आहे. 50 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठीचे भूसंपादन येत्या 15 दिवसांत पूर्ण होणार असून, त्यानंतर 15 मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 710 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला हा रस्ता 84 मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव होता. मात्र भूसंपादन प्रक्रियेत अडचणी आल्याने रस्त्याची रुंदी 50 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
कसा आहे महामार्ग?
कात्रज परिसरातील राजस सोसायटीपासून कोंढवा परिसरातील खडी मशिन चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला ऑक्टोबर 2018 मध्ये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नव्हते. सध्या भूसंपादन अंतिम टप्प्यात असून, लवकरच रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. शहरातील मिसिंग लिंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 30 रस्त्यांपैकी 12 रस्त्यांची कामे चालू वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नव्या रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने पूर्ण केले जाणार आहे.
advertisement
शहरातील काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने टाकलेल्या ओव्हरहेड केबल्समुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा केबल्सची स्वतंत्र पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीच्या आधारे पुढील महिन्यात ओव्हरहेड केबल्सबाबतचे धोरण अंतिम करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
कात्रज–कोंढवा रस्त्याचे होणार काम, भूसंपादन शेवटच्या टप्प्यात, कसा आहे 710 कोटींचा मार्ग?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement