advertisement

Bigg Boss Marathi 6: "अभी मजा आएगा ना भिडू...", 'बिग बॉस'च्या घरात 'बिग बॉस क्वीन'ची एन्ट्री होणार?

Last Updated:

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये काही दिवसांसाठी वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. स्पर्धकांसोबत राडा घालायला 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'बिग बॉस क्वीन' येणार आहे.

Bigg Boss Marathi 6: "अभी मजा आएगा ना भिडू...", 'बिग बॉस'च्या घरात 'बिग बॉस क्वीन'ची एन्ट्री होणार?
Bigg Boss Marathi 6: "अभी मजा आएगा ना भिडू...", 'बिग बॉस'च्या घरात 'बिग बॉस क्वीन'ची एन्ट्री होणार?
मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये काही दिवसांसाठी वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात 15 ते 16 स्पर्धक आहेत. आता अशातच वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होताना दिसणार आहे. पुन्हा एकदा 'बिग बॉस क्वीन' 'बिग बॉस मराठी'च्या घरात राडा घालायला येणार आहे. अद्याप निर्मात्यांकडून याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नसून तिच्या एन्ट्रीबद्दल सेलिब्रिटींबद्दल चाहत्यांना माहिती देणाऱ्या चॅनलकडून ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा होताना दिसत आहे.
काही तासांपूर्वीच 'राजश्री मराठी'च्या इन्स्टा हँडलवर या बातमीची माहिती देण्यात आली आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात राखी सावंत येणार असल्याचं कळताच चाहत्यांकडून बिग बॉसच्या घरात चांगलाच दंगा होणार असल्याचं बोललं जात आहे. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सहाच्या घरातील तापमान आता चांगलंच वाढणार आहे. याचं कारण, बिग बॉस क्विन राखी सावंत 15 दिवसांसाठी बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे, अशी माहिती राजश्री मराठीला जवळच्या सुत्रांनी दिलीये. राखी सावंत बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक चांगलेच खडखडून जागे होतील, हे मात्र नक्की.
advertisement
प्रत्येक स्पर्धक आपल्या वेगवेगळी रणनिती आखून खेळ खेळणार, हे मात्र नक्की आहे. बिग बॉस हिंदीसह बिग बॉस मराठीतही गेल्या अनेक सीझन्सपासून राखी सावंतला चाहते पाहत आहेत. आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखली जाणारी राखी प्रेक्षकांसह स्पर्धकांचेही खळखळून मनोरंजन करते. तिच्या वक्तव्यांची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये राखी सावंत वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती. शिवाय, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये एक ते दोन दिवसांसाठी राखी सावंत आली होती. आता देखील राखी 15 दिवसांसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
सोशल मीडियावर चाहत्यांकडून राखीसोबत अनेक स्पर्धकांचे भांडण व्हायला हवे, अशी कमेंट युजर्सने केली आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये स्पर्धकांची नावं सुद्धा लिहिलेली आहेत. नेमकी राखी केव्हा बिग बॉसच्या घरात येणार ? याची माहिती मिळालेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6: "अभी मजा आएगा ना भिडू...", 'बिग बॉस'च्या घरात 'बिग बॉस क्वीन'ची एन्ट्री होणार?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement