advertisement

'रामायण' विरुद्ध 'रामायण'! रणबीर कपूरच्या 4000 कोटींच्या फिल्मला 'हा' चित्रपट देणार टक्कर; कधी होणार रिलीज?

Last Updated:

Valmiki Ramayana Release Date: रणबीर कपूरच्या 'रामायण'ला तगडी टक्कर देण्यासाठी आणखी एक रामायण सज्ज झालं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट रणबीरच्या सिनेमाच्या आधीच चित्रपटगृहात धडकणार आहे.

News18
News18
मुंबई : 'धुरंधर २' च्या वादळात नव्या चित्रपटाने धमाकेदार एन्ट्री केली आहे. यामुळे सध्या मनोरंजन विश्वात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय. एकीकडे 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडलेले असतानाच, रणबीर कपूरच्या ४००० कोटींच्या 'रामायण'ने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. नुकतंच काही तासांपूर्वी 'रामायण' या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर लाँच झाला आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली, ती म्हणजे प्रभू श्री राम यांच्या रुपात असलेल्या रणबीर कपूरची.
दरम्यान, रणबीर कपूरच्या 'रामायण'ला तगडी टक्कर देण्यासाठी आणखी एक रामायण सज्ज झालं आहे. हनुमान जयंतीचं औचित्य साधून 'वाल्मिकी रामायण' नावाच्या भव्य चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट रणबीरच्या सिनेमाच्या आधीच चित्रपटगृहात धडकणार आहे.
advertisement

हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर मोठी घोषणा

प्रसिद्ध फिल्म क्रिटीक तरण आदर्श यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून 'वाल्मिकी रामायण' या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर आणि रिलीज डेट शेअर केली आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून भावना दत्ता तलवार यांनी या पौराणिक चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. वाल्मिकी ऋषींच्या मूळ रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.
advertisement
advertisement
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'रामायण भाग-१' दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. मात्र, त्याआधीच २ ऑक्टोबर २०२६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 'वाल्मिकी रामायण' चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. या दोन्ही चित्रपटातील मुख्य फरक म्हणजे रणबीर कपूरच्या ४००० कोटींच्या 'रामायण'मध्ये हाय-टेक व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे 'वाल्मिकी रामायण' ही मूळ ग्रंथावर आधारित मांडणी असणार आहे.
advertisement
या दोन चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर 'रामायण' विरुद्ध 'रामायण' असा एक अनोखा सामना पाहायला मिळणार आहे. रणबीरच्या टिझरला सध्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी, 'वाल्मिकी रामायण'ची साधी, पण तितकीच आध्यात्मिक मांडणी प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणं रंजक ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'रामायण' विरुद्ध 'रामायण'! रणबीर कपूरच्या 4000 कोटींच्या फिल्मला 'हा' चित्रपट देणार टक्कर; कधी होणार रिलीज?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement