advertisement

श्रीगोंद्यात धक्कादायक घटना, पोलीस भरती अकादमीत तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार

Last Updated:

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरती प्रशिक्षणाच्या अकॅडमी कार्यरत असून काही ठिकाणी प्रशिक्षणार्थींना तथाकथित स्टॅमिना वाढीसाठी अमली पदार्थ दिले जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

पोलीस भरती अकादमीत तरुणीवर अत्याचार
पोलीस भरती अकादमीत तरुणीवर अत्याचार
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, श्रीगोंदा (अहिल्यानगर): श्रीगोंदा शहरातल्या एका पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीत तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
आरोपीला तात्काळ अटक करावी, तसेच शहरात सुरू असलेल्या ड्रग्ज विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरती प्रशिक्षणाच्या अकॅडमी कार्यरत असून काही ठिकाणी प्रशिक्षणार्थींना तथाकथित स्टॅमिना वाढीसाठी अमली पदार्थ दिले जात असल्याचे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले.

व्यायामशाळांमधून तरुणांना ड्रग्ज?

अत्याचार प्रकरणानंतर शहरात संतापाचे वातावरण आहे. आंदोलकांनी डीएसपी चौक परिसरात जमून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात ड्रग्सचा खुलेआम व्यवहार सुरू असल्याचा आरोप करत, डबल सीट दुचाकींवरून नियम मोडत फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. काही व्यायामशाळांमधून तरुणांना व्यसनाधीन केलं जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यावेळी आधी लव्ह जिहाद, लँड जिहाद ऐकलं, आता ड्रग्सच्या माध्यमातून तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरू आहे, असा गंभीर इशाराही देण्यात आला.
advertisement

संग्राम जगताप यांचा निर्वाणीचा इशारा

श्रीगोंद्यात झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. आरोपी अजूनही मोकाट फिरतोय, हे पोलिसांचे अपयश आहे. शहरात ड्रग्सचा सुळसुळाट झाला आहे. डीएसपी चौकात नियम मोडत फिरणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जर पोलिसांनी कठोर पावलं उचलली नाहीत, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
श्रीगोंद्यात धक्कादायक घटना, पोलीस भरती अकादमीत तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement