सोलापूर : अंगी मेहनत करण्याची इच्छा जिद्द आणि चिकाटी असेल तर शून्यातून जग निर्माण करता येते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी गावातील तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नागरबाई काळे यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. सुरुवातीला मिक्सरमध्ये टाकून चटणी बनवायला सूरू केली. आज त्यांनी आपल्या मिरची पावडर व्यवसायला स्वतःचा ब्रँड बनवले आहे. पाहुयात नागरबाई काळे यांच्या या व्यवसायाची यशस्वी यशोगाथा.
advertisement
नागरबाई काळे यांनी आधी मिक्सरमधून काळा तिखट बनवायला सुरुवात केली. हळूहळू करत काळा तिखटाची मागणी वाढू लागली. मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी १ ६ हजार रुपये खर्च करून मिरची पावडर तयार करण्यासाठी मशीन घेतली. आता दररोज त्या मशीनवर ३ ० ते ४ ० किलो मिरची पावडर तयार करत आहेत. तसेच या मिरची पावडरची विक्री सोलापूर जिल्ह्यात करत आहेत.
नागरबाई काळे यांचे पती मोहोळ, कामती, पाटकुल या गावातील आठवडी बाजारात ती मिरची पावडर विकत आहेत. नागरबाई काळे हे होलसेल दरात तीनशे रुपये किलो दराने घरगुती तयार केलेले चटणी विकत आहेत. तसेच जवस, कारळे व शेंगा चटणी सुद्धा तयार करून विकत आहेत. या मिरची विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी स्वतःचा विवेक मसाले अँड फूड्स या नावाने ब्रँड देखील तयार केला आहे. या मिरची विक्रीच्या व्यवसायातून सर्व खर्च वजा करून महिन्याला एक ते दीड लाखांची उलाढाल होत आहे. तर वर्षाला १ २ ते १ ५ लाखांची उलाढाल होत आहे.
वाढती महागाई लक्षात घेता महिलांनी सुद्धा घरगुती उद्योग सुरू करावा. लहान का होईना स्वतःचा घरगुती उद्योग सुरू करावा जेणेकरून कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, असे आवाहन तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या यशस्वी उद्योजिका नागरबाई काळे यांनी केले आहे.