घरची परिस्थिती बेताची, पण जिद्द सरकारी नोकरी मिळवायची, 800 रुपयांच्या गुंतवणुकीत तरुण करतोय हा व्यवसाय

Last Updated:
अमरावतीमधील विद्यार्थी शिवाजी वाढोणकर याने चहाचे स्टॉल सुरू केले आहे. एमपीएससीची तयारी करत असताना व्यवसाय सुरू करून त्यातून तो चांगला नफा कमावत आहे.
1/7
अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगत शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरांकडे वळतात. त्यातीलच एक असलेला विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील शिवाजी वाढोणकर. 15 वर्षांपूर्वी कुटुंबासह तो अमरावतीमध्ये स्थायिक झाला. आयुष्यात कितीही मेहनत करावी लागली तरीही सरकारी नोकरी मिळवायची अशी जिद्द त्याच्या मनामध्ये आहे.

advertisement
2/7
 त्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरू असताना कोरोना नावाचं संकट आलं आणि त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला. आर्थिक बाजू कमकुवत झाली. त्यावेळी त्याने अवघ्या 700 ते 800 रुपयांची गुंतवणूक करून स्कूटर स्टँडवर चहाचे स्टॉल सुरू केले. त्यातून त्याला कमाई होत असल्याचे बघून त्याने एमपीएससी चाय म्हणून स्टॉल सुरू केले. व्यवसाय आणि अभ्यास या दोन्हींचा मेळ साधत त्याची वाटचाल स्वप्नपूर्तीकडे सुरू आहे.

3/7
एमपीएससीची तयार करत चहा विकणाऱ्या शिवाजीने लोकल 18 शी संवाद सांधला. तेव्हा तो सांगतो की, मूळचा मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे. काही कारणास्तव अमरावतीमध्ये 15 वर्षांपूर्वी स्थायिक झालो. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील प्रायव्हेट जॉब करत होते.

4/7
त्यातूनच आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण झाले. लहापणापासूनच माझ स्वप्न सरकारी नोकरीच होत. काही कळत नव्हतं तेव्हा पण मी सरकारी नोकरीच करणार असं म्हणायचो. 11 वी पासून मी एमपीएससीच्या तयारीला लागलो. अभ्यास आणि इतर सगळं व्यवस्थित सुरू असताना कोरोना नावाचं संकट आलं. तेव्हापासून आयुष्यच बदलून गेलं.

5/7
घरात वडील आणि भाऊ दोघे पण कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. घरची परिस्थिती एकदम डबघाईला आली. काय करावं? सुचत नव्हतं, तेव्हा चहा विकण्याची कल्पना डोक्यात आली. सर्वात आधी कापूस मंडीमध्ये पायदळ चहा विकत होतो. घरून बनवायचा आणि पायदळ जावून विकायचा. त्यानंतर स्कुटीवर सेटअप तयार केलं. त्यातून नफा मिळायला लागला. त्यातून मग हात गाडी घेतली त्यावर चहा विकायला सुरुवात केली. त्या सोबतच माझा अभ्यास सुरूच होता.

6/7
त्यानंतर मी दुसरे चहाचे स्टॉल सुद्धा सुरू केले. आता माझे दोन स्टॉल आहेत. एक स्टॉल माझा मित्र चालवतो. गणेश गांजरे हा माझा मित्र निराश होऊन घरी परतणार होणार. कारण त्याला एमपीएससी मध्ये अपयश आले होते. मी त्याला थांबवून हा चहाचा स्टॉल त्याला चालवायला दिलाय. माझे दोन्ही स्टॉल व्यवस्थित सुरू आहे.

7/7
अवघ्या 800 रुपयांत सुरू केलेला व्यवसायात आज माझी दिवसाला 6 ते 7 हजार रुपये उलाढाल होत आहे. माझा व्यवसाय आणि माझं स्वप्न दोन्ही मी पूर्ण करणार आहे, असे शिवाजी वाढोणकर याने सांगितले.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement