लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये दाखल झाल्या असून त्या निरंजिनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्व कैलाशानंद गिरी यांच्या आश्रमात राहणार आहेत. लॉरेन या कल्पवास येथे साधूंच्या सहवासात साध्या पद्धतीने राहतील. लॉरेन पॉवेल जॉब्स याचा समावेश जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचा समावेश होतो.
स्वामी कैलाशानंद यांनी सांगितले की, लॉरेन पॉवेल जॉब्स यांना सनातन धर्मात खूप रस आहे. त्या ध्यान करण्यासाठी भारतात आल्या आहेत. अखाड्याच्या पेशवाई विधीत त्यांना सहभागी केले जाणार आहे. महाकुंभाच्या दरम्यान संन्यास्यासारखे जीवन जगतील. शाही स्नान (१४ जानेवारी) आणि मौनी अमावस्या (२९ जानेवारी)च्या वेळी त्या शाही स्नान करतील.
advertisement
लॉरेन एक यशस्वी उद्योजिका आहेत आणि अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सभाग असतो.सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर त्यांनी स्वत:ची मते स्पष्टपणे मांडली आहेत. एमर्सन कलेक्टिव या संस्थेच्या माध्यमातून त्या शिक्षण सुधारणा, हवामान बदल, आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर काम करतात.
किती आहे नेटवर्थ
मीडिया रिपोट्सनुसार लॉरेन पॉवेल जॉब्स एकूण संपत्ती १५.८ अब्ज डॉलर्स आहे. त्यांच्या पती स्टीव्ह जॉब्स हे जगातील सर्वात मूल्यवान कंपनी ऍपलचे सह-संस्थापक होते. या कंपनीचे बाजारमूल्य ३.५८० ट्रिलियन डॉलर्स आहे. ऍपलने गेल्या वर्षी भारतातून एक लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन निर्यात केली होती.
लॉरेन या फक्त जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक नाही तर त्या जगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहेत. २०२३ मध्ये फोर्ब्स मासिकाने त्यांना जगातील २५व्या सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान दिले होते. त्या अमेरिकेतील प्रमुख मासिक द अटलांटिकच्या ऑनर आणि चेअरमन आहेत. शिक्षण सुधारण्यासाठी त्यांनी कॉलेज ट्रॅकची सह-स्थापना केली होती.