क्रॉफर्ड मार्केटमधील बोल्ड बी या दुकानात नेल आर्टसाठी लागणारे साहित्य अगदी 8 रुपयांपासून मिळते. नेल आर्ट काढण्यासाठी लागणारे ग्लिटर पावडर, नेल स्टिकर्स, छोटे स्टोन्स आणि बिंदी यांची सुरुवात 8 रुपयांपासून होते. त्यामुळे कमी पैशात वेगवेगळ्या डिझाईनसाठी आवश्यक साहित्य सहज खरेदी करता येते.
Success Story : फक्त 25 गुंठ्यात केली शेती, शेतकऱ्याची आता लाखात कमाई, असं काय केलं?
advertisement
नेल आर्ट डिझाईन तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली डॉटिंग टूल्स, नेल आर्ट ब्रश आणि लाइनर ब्रश ही साधने देखील येथे स्वस्त दरात उपलब्ध आहेत. साधे डॉटिंग टूल 10 ते 15 रुपयांपासून, तर नेल आर्टसाठी वापरले जाणारे ब्रश आणि लाइनर ब्रश 15 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याचबरोबर थोडे जाड आणि चांगल्या क्वालिटीचे ब्रश 20 ते 50 रुपयांपासून मिळतात, जे फुलांचे, लाईन वर्क आणि फाईन डिझाईनसाठी उपयोगी पडतात.
नेल आर्ट टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले बेस कोट आणि टॉप कोट देखील येथे कमी दरात मिळतात. साधा बेस कोट किंवा टॉप कोट 50 रुपयांपासून उपलब्ध असून, यामुळे नेल आर्ट अधिक आकर्षक दिसते आणि जास्त काळ टिकते. याशिवाय नखे कापण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नेल क्लिपर, क्युटिकल पुशर आणि क्युटिकल कटर ही साधने 20 ते 50 रुपयांपासून मिळतात.
ग्राहकांसाठी स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने कॉटन, कागदी वाइप्स आणि नेल क्लिनिंग साहित्य देखील येथे कमी किमतीत उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य एकत्र केल्यास पंधराशे रुपयांच्या आत संपूर्ण नेल आर्ट किट तयार करता येते, ज्याच्या मदतीने व्यवसायाची सुरुवात करता येते.