Success Story : फक्त 25 गुंठ्यात केली शेती, शेतकऱ्याची आता लाखात कमाई, असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
गेल्या चार वर्षांपासून सातत्याने वाल शेंगाची लागवड करत असताना या पिकातून मिळणाऱ्या वाढत्या नफ्यामुळे त्यांनी क्षेत्रातही वाढ केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथील प्रगतशील शेतकरी धनराज जंजाळ यांनी वाल शेंगाच्या शेतीतून उत्पन्नाचे नवे गणित मांडले आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने वाल शेंगाची लागवड करत असताना या पिकातून मिळणाऱ्या वाढत्या नफ्यामुळे त्यांनी क्षेत्रातही वाढ केली आहे. सध्या 25 गुंठे क्षेत्रात अंकुर वाणाच्या वाल शेंगाची लागवड करण्यात आली असून, या शेतीतून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. पुढील काळात उत्पादन वाढून एकूण उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा धनराज जंजाळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
फुलंब्रीच्या सताळ पिंपरी येथील धनराज जंजाळ यांना वाल शेतीतून गतवर्षी 3.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा देखील अंकुर वाल शेंगा वाणाची लागवड त्यांनी केलेली आहे. या शेतीसाठी ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. दर चार ते पाच दिवसाला वालाच्या वेलांना वातावरणानुसार पाणी देण्यात येते. तसेच या शेतीसाठी रासायनिक खतांसह शेणखताचा देखील वापर करण्यात येतो. वाल वेलवर प्रामुख्याने पाहिले तर अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो मात्र योग्य फवारणी केली तर त्याला आटोक्यात देखील आणता येते.
advertisement
वाल शेती पाहण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी दररोज अनेक शेतकरी येत असतात. अनेक शेतकऱ्यांनी वाल शेतीचा प्रयोग पाहून ही शेती करायला सुरुवात केली आहे. तसेच या शेतीमध्ये पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. विशेषतः शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही त्यामुळे वाल शेती शेतकऱ्यांनी करायला हवी, अशी देखील प्रतिक्रिया जंजाळ यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 18, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : फक्त 25 गुंठ्यात केली शेती, शेतकऱ्याची आता लाखात कमाई, असं काय केलं?









