Dosa Secret : हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरी जमत नाही? प्रसिद्ध शेफने सांगितली पीठ तयार करण्याची 'ही' खास पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना वाटतं की डोसा बनवणं सोपं आहे, पण खरं कौशल्य हे त्याचं पीठ (Batter) तयार करण्यात असतं. प्रसिद्ध शेफ राजशेखर चिन्नासामी यांच्या मते, डाळ-तांदूळ भिजवण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंतच्या छोट्या चुका चवीत मोठा बदल घडवतात.
सकाळची घाई असो किंवा रविवारचा निवांत नाश्ता, गरमागरम आणि कुरकुरीत डोसा दिसला की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आपण अनेकदा घरी डोसा बनवण्याचा प्रयत्न करतो, पण कधी तो तव्याला चिकटतो, तर कधी हवा तसा कुरकुरीत होत नाही. मग प्रश्न पडतो की, हॉटेलमधील डोसे इतके परफेक्ट, लालसर आणि कुरकुरीत कसे काय असतात?
advertisement
अनेकांना वाटतं की डोसा बनवणं सोपं आहे, पण खरं कौशल्य हे त्याचं पीठ (Batter) तयार करण्यात असतं. प्रसिद्ध शेफ राजशेखर चिन्नासामी यांच्या मते, डाळ-तांदूळ भिजवण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंतच्या छोट्या चुका चवीत मोठा बदल घडवतात. चला तर मग जाणून घेऊया, परफेक्ट हॉटेल स्टाईल डोसा बनवण्याचे काही खास गुपितं.
advertisement
1. साहित्याचे अचूक प्रमाण (The Golden Ratio)तांदूळ आणि डाळ:1 किलो तांदळासाठी पाव किलो उडीद डाळ हे योग्य प्रमाण आहे. (जर तुम्ही कपने मोजत असाल, तर 4 कप तांदळासाठी 1 कप उडीद डाळ पुरेशी आहे.)रंग आणि कुरकुरीतपणा: डोशाला छान हॉटेलसारखा लालसर रंग येण्यासाठी त्यात 50 ग्रॅम पोहे (Atukulu) आणि एक मोठा चमचा मेथी दाणे नक्की टाका. मेथीमुळे डोसा पचायलाही हलका होतो. त्यात तुम्ही 2 चमचे चण्याची डाळ सुद्धा घालू शकता.
advertisement
2. भिजवण्याची योग्य पद्धतअनेकांना डाळ आणि तांदूळ एकत्र भिजवण्याची सवय असते, पण हीच मोठी चूक आहे.तांदूळ आणि डाळ किमान 5 तास किंवा रात्रभर वेगवेगळे भिजवावेत. तांदळामध्ये भिजवताना तुम्ही पोहे, मेथी, चणाडाळ भिजत घालू शकता.डाळ आणि मेथी: सर्वात आधी डाळ वाटा, कमी पाणी टाकून त्याला एकदम पातळ आणि पीठ हलकं होईल एवढं वाटा. ज्यामुळे पीठ लोण्यासारखे मऊ होईल. त्यानंतर तांदळाचं पीठ वाटा, जे हलकं जाडसर ठेवा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
5. डोसा तव्यावर टाकण्याची ट्रिकपॅन गरम झाल्यावर त्यावर पाण्याचे हबके मारा आणि सुती कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर थोडे तेल लावा. यामुळे डोसा तव्याला चिकटणार नाही. पळीने पीठ मध्यभागी टाकून ते कडेपर्यंत गोलाकार पसरवा. या साध्या पण प्रभावी टिप्स वापरल्या तर तुमच्या घरचा डोसा बघून कोणालाही वाटेल की तुम्ही तो एखाद्या नामांकित हॉटेलमधूनच मागवला आहे.






