छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज गावात दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा यशस्वी नमुना उभा केला आहे. प्रामुख्याने डोंगराळ आणि थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे पीक त्यांनी आपल्या शेतात फुलवले आहे. समाधान बलांडे आणि गणेश बलांडे या दोन भावांनी प्रत्येकी पाच गुंठे अशी दोघांनी मिळून दहा गुंठे क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केवळ तीन महिन्यांतच या पिकातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. येत्या काळात उत्पन्नात आणखी 2 लाखांची वाढ होईल, असा विश्वास बलांडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केला आहे.
Last Updated: December 17, 2025, 20:06 IST


