TRENDING:

भारतीय कंपनीने एका रात्रीत 1 हजार 600 कर्मचाऱ्यांना नारळ दिला, काम करणाऱ्यांची झोप उडाली; अजून किती जणांच्या नोकर्‍या जातील?

Last Updated:

Jobs Cut: टाटा स्टीलच्या एका निर्णयाने हजारो कर्मचाऱ्यांच्या भवितव्याला धक्का बसला आहे. कंपनीने युरोपमधील खर्च कमी करण्यासाठी नेदरलँडमध्ये तब्बल 1,600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.

advertisement
मुंबई:  जागतिक बाजारातील अस्थिरता, व्यापर युद्ध यामुळे मंदीचे वातावरण तयार झाले आहे. अशात गुगलने ड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल फोन आणि क्रोम ब्राउझर विभागांतील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या वृत्ताला काही तास देखील होण्याआधी आता एका भारतीय कंपनीने 1 हजार 600 जणांना कामावरून कमी केल्याची बातमी समोर आली आहे.
News18
News18
advertisement

टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 6 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. टाटा स्टीलच्या शेअर भावात वाढ होण्यामागे 1600 कर्मचाऱ्यांच्या कमी करण्यासंबंधित बातमी कारणीभूत मानली जात आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, खर्चात कपात करण्यासाठी नेदरलँडमध्ये 1600 लोकांना कामावरून कमी केले जाईल. कंपनीचा उद्देश म्हणजे युरोपियन ऑपरेशन्समधून पुन्हा नफा मिळवणे.

कुजबुज सत्यात उतरली, शेकडो कर्मचाऱ्यांची रातोरात हकालपट्टी, टेक वर्ल्ड हादरलं

advertisement

टाटा स्टीलने गुरुवारी सांगितले की, 20 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आहे. यामुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 500 मिलियन युरोची बचत होणार आहे.

या कपातीचा परिणाम कंपनीवरही होईल. मॅनेजमेंट आणि सपोर्ट रोल्समध्ये बदल पाहायला मिळू शकतो. मागील आर्थिक वर्षात टाटा स्टीलच्या डच युनिटला 556 मिलियन युरोचा तोटा झाला होता. या नुकसानीचे कारण ऊर्जा दरवाढ आणि मागणीत घट मानली जात आहे. IJmuiden प्लांटवर सातत्याने प्रदूषण कमी करण्यासाठी दबाव आहे.

advertisement

आमच्यात किती दम आहे ते दाखवतो, चीनने फोडला टॅरिफ बॉम्ब; संघर्ष नव्या टप्प्यावर

शेअरमध्ये 6 टक्क्यांची उसळी BSE मध्ये शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीनंतर 134.95 रुपये पातळीवर उघडले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार सुरू आहे.

एक्सपर्ट्स काय म्हणतात?

ब्रोकरेज हाउस जेपी मॉर्गनने या शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिले आहे. त्यांनी टाटा स्टीलच्या शेअर्ससाठी 180 रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे. जे सध्याच्या किमतीपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. मॅक्वेरीने 156 रुपयांचे टार्गेट प्राइस सेट केले आहे. या ब्रोकरेज हाउसने टाटा स्टीलला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिले आहे. या अंदाजानुसार कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, CLSA ने 145 रुपयांच्या टार्गेट प्राइससह ‘होल्ड’ रेटिंग दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
भारतीय कंपनीने एका रात्रीत 1 हजार 600 कर्मचाऱ्यांना नारळ दिला, काम करणाऱ्यांची झोप उडाली; अजून किती जणांच्या नोकर्‍या जातील?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल