TRENDING:

5 वर्षांच्या FD वर ही बँक देतेय 8 टक्केपर्यंत व्याज! या लोकांना मिळेल फायदा 

Last Updated:

काही स्मॉल फायनेन्स बँका सामान्य नागरिकांसाठी 5 वर्षांच्या एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहेत. चला या बँकांबद्दल आणि व्याजदरांबद्दल जाणून घेऊया.

advertisement
मुंबई : बाजारात तुमचे पैसे गुंतवण्यासाठी आणि प्रभावीपणे पैसे कमवण्यासाठी अनेक गुंतवणूक ऑप्शंस उपलब्ध आहेत. ज्यात स्टॉक, म्युच्युअल फंड आणि ईटीएफ यांचा समावेश आहे. सुरक्षित रिटर्नसाठी, पीपीएफ आणि एफडी सारख्या योजना प्रमुख आहेत. म्हणून, आम्ही तुम्हाला काही बँकांबद्दल सांगूया जे FDवर शानदार व्याजदर देत आहेत.
फिक्स्ड डिपॉझिट
फिक्स्ड डिपॉझिट
advertisement

काही बँका सध्या सामान्य नागरिकांसाठी, म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी, पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर (एफडी) 8% पर्यंत व्याजदर देत आहेत. ज्याची मॅक्सिमम लिमिट ₹3 कोटी आहे. आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगूया जे पाच वर्षांच्या मुदतीसाठी 8% पर्यंत FD व्याजदर देत आहेत.

सॅलरी स्लिपशिवाय पर्सनल लोन हवंय? हो 5 डॉक्यूमेंट तुमचं काम करतील सोपं

advertisement

FD इंटरेस्ट रेट

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक - सूर्योदय स्मॉल फायनान्स ही पहिली बँक आहे जी सामान्य गुंतवणूकदारांना 5 वर्षांच्या कालावधीत उत्कृष्ट व्याजदर देत आहे. ही बँक 60 वर्षांखालील सामान्य नागरिकांसाठी पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 8% व्याजदर देते.

जन स्मॉल फायनान्स बँक - जन स्मॉल फायनान्स बँक देखील एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहे.जन स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांसाठी पाच वर्षांच्या FDवर 8% व्याजदर देत आहे.

advertisement

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक - उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांसाठी पाच वर्षांच्या FDवर 7.2% व्याजदर देत आहे.

रेंटच्या घरातही निर्धास्त राहायचंय? मग Rent Agreement अ‍ॅड करा या 10 गोष्टी

बँक FDमधून TDS कधी कापला जातो?

प्रत्येक बँक एफडीवर किती पैसे देते हे समजून घेतल्यानंतर, एफडीमधून टीडीएस कसा कापला जातो हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. एखाद्या विशिष्ट बँकेकडे असलेल्या एफडीवर मिळालेले व्याज 1 लाखांपेक्षा जास्त असेल, तर बँकांना स्रोतावर कर वजावट (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, टीडीएस हा अतिरिक्त कर नाही. तुम्ही तो रिटर्न म्हणून परत मिळवू शकता किंवा तुमचा आयकर रिटर्न (आयटीआर) भरताना तुमच्या एकूण कर दायित्वामध्ये समाविष्ट करू शकता. शिवाय, तुम्ही टॅक्स रिफंडसाठी पात्र असाल, तर तुम्ही त्या रिफंडवरील व्याजासाठी देखील पात्र असू शकता.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
5 वर्षांच्या FD वर ही बँक देतेय 8 टक्केपर्यंत व्याज! या लोकांना मिळेल फायदा 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल