भारतीय बाजारावर परिणाम
गिफ्ट निफ्टी 1.2% नी घसरला असून, जपानचा निक्केई निर्देशांक 4% नी खाली आला आहे. परिणामी, आज भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. एक्स्पर्ट्सच्या मते, सेन्सेक्स 1000-2000 प्वाइंटपर्यंत पडू शकतो. विशेषतः ऑटोमोबाईल, टेक्सटाईल, डायमंड आणि फार्मा क्षेत्राला या टैरिफचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारत-अमेरिका व्यापार तणावात?
advertisement
ट्रंप यांनी भारताबद्दल भाष्य करताना स्पष्ट सांगितले की, “भारत अमेरिकन मोटरसायकल्सवर 70% टॅक्स लावतो, तर आम्ही भारतीय मोटरसायकल्सवर केवळ 2.4% कर लावतो. आता आम्हीही तितकाच कर लावू.” यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
मध्यरात्री 1.56 वाजता संसदेत ऐतिहासिक निर्णय! 110 मिनिटांत फिरली चक्र, Waqf Bill लोकसभेत मंजूर
डॉलरमध्ये तेजी, जागतिक बाजार अस्थिर
ट्रंप यांच्या घोषणेनंतर डॉलर मजबूत झाला असून बॉण्ड मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. हे संकेत शेअर बाजारासाठी सकारात्मक नसून, जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिका-कनाडा व्यापार मात्र पूर्वीच्या अटींवर कायम राहील, मात्र भारतासह अनेक देशांना याचा फटका बसणार आहे.
ग्लोबल ट्रेड वॉर आणि महागाईचा धोका?
अमेरिकेच्या नव्या टैरिफमुळे ग्लोबल ट्रेड वॉरची भीती अधिक गडद झाली आहे. जगभरातील देश आता प्रत्युत्तरादाखल टेरिफ वाढवू शकतात, ज्यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, या नव्या धोरणामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागेल.
भारतीय बाजार पुढे काय?
गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीत सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, बाजार मोठ्या घसरणीनंतर पुन्हा सावरू शकतो, मात्र जागतिक घटनांचा परिणाम पुढील काही आठवड्यांसाठी बाजारावर राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन रणनीती आखणे महत्त्वाचे ठरणार आहे.