TRENDING:

Success Story : व्यवसायाला दिली शिक्षणाची जोड, तुषारने उभारला बेकरी ब्रँड, महिन्याला 5 लाखांची उलाढाल

Last Updated:

शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा, स्वतःचा उद्योग उभा करून इतरांना रोजगार देण्याचं स्वप्न नाशिकच्या तुषार शहरकर या तरुणाने पाहिलं.

advertisement
नाशिक : शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा, स्वतःचा उद्योग उभा करून इतरांना रोजगार देण्याचं स्वप्न नाशिकच्या तुषार शहरकर या तरुणाने पाहिलं. वडिलांच्या कष्टाचा वारसा आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणाची जोड देत, तुषारने आज अष्टकंम फूड्स अँड बेकर्स या ब्रँडच्या माध्यमातून नाशिकमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायातून तो आज महिन्याला तब्बल 5 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
advertisement

वडिलांचा वारसा आणि शिक्षणाची जोड

तुषारला लहानपणापासूनच घरातून व्यवसायाचे बाळकडू मिळाले होते. त्याचे वडील हॉटेल व्यवसायात होते, त्यामुळे तुषारच्या मनातही उद्योजकतेचे विचार घोळत असत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने सुरुवातीला वडिलांच्या व्यवसायात हातभार लावला. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने एका हॉटेलचे रूपांतर चार हॉटेल्समध्ये केले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते.

घरातील सर्वच खातील आवडीने, बनवा चवदार सोयाबीन पकोडे, रेसिपीचा संपूर्ण Video

advertisement

कोरोनाचे संकट आणि नवी सुरुवात

व्यवसाय शिखरावर असतानाच कोरोना महामारीचे संकट आले आणि सुरू असलेला हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. आर्थिक नुकसान आणि कर्जाचा डोंगर समोर असतानाही तुषार डगमगला नाही. त्याने हार न मानता पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याचे ठरवले. हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणामुळे त्याला बेकरी क्षेत्रातील बारकावे माहीत होते, याचाच फायदा त्याने घेतला.

advertisement

अष्टकंम फूड्सची यशस्वी घोडदौड

तुषारने जिद्दीने बेकरी युनिट सुरू केले. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण न डगमगता तो पुढे जात राहिला. आज त्याच्या कंपनीत कुरकुरीत खारी आणि टोस्ट, क्रीम रोल आणि विविध प्रकारचे ब्रेड, अनेक बेकरी उत्पादने बनवले जातात. उच्च दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर आणि चविष्ट उत्पादनांमुळे अल्पावधीतच नाशिककरांनी त्याच्या उत्पादनांना पसंती दिली आहे. आज तुषार केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर तो अनेक तरुणांसाठी आदर्श ठरला आहे.

advertisement

उत्तम चवीची मेजवानी हवी असल्यास नक्की भेट द्या

पत्ता: अष्टविनायक फूड्स अँड बेकर्स, अमृतधाम, पंचवटी, के.के. वाघ कॉलेज जवळ, नाशिक.

मराठी बातम्या/मनी/
Success Story : व्यवसायाला दिली शिक्षणाची जोड, तुषारने उभारला बेकरी ब्रँड, महिन्याला 5 लाखांची उलाढाल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल