क्रेडिट कार्डमध्येही असंच असतं. हा बदल सामान्य यूझर्ससाठी दिलासादायक असु शकतो. तर क्रेडिट कार्डशी संबंधित कंपन्यांची चिंताही वाढू शकते.
UPI क्रेडिट लाईन
UPI क्रेडिट लाईन्सना लोकांमध्ये फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची व्याज देणारी प्रणाली. जेव्हा जेव्हा यूझरने या सुविधेचा वापर करून पेमेंट केले तेव्हा त्याच दिवसापासून त्या रकमेवर व्याज जमा होणे अपेक्षित होते.
advertisement
Petrol Pumpवर लावला जातोय शेकडोंचा चुना! फसवणुकीपासून बचावाच्या 5 आवश्यक टिप्स
उदाहरणार्थ, एखाद्याच्या खात्यात पैसे नसतील आणि त्यांना त्यांची तातडीने गरज असेल, तर त्यांना पैसे मिळतील, परंतु व्याजाचा दबाव लगेच सुरू होईल. ही भीती बहुतेक लोकांना UPI क्रेडिट लाइन वापरण्यापासून रोखते.
नवा प्लॅन काय?
NPCI च्या नव्या प्लॅन अंतर्गत यूपीआय क्रेडिट लाइनला क्रेडिट कार्डप्रमाणे ग्रेस पीरियड देण्याची शक्तया आहे. या पीरियडमध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारे व्याज घेतले जाणार नाही. अशा प्रकारची सुविधा क्रेडिट कार्डमध्ये मिळते.
याचा अर्थ असा की, गरज पडल्यास तुम्ही तुमच्या क्रेडिट लाइनमधून खर्च करू शकता आणि बिल देय तारखेपूर्वी ते फेडू शकता. असे करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
काही बँकांनी नवीन उपक्रम सुरू केले आहेत
हा बदल निवडक बँकांमध्ये आधीच सुरू झाला आहे. येस बँकेने त्यांच्या UPI क्रेडिट लाइनवर 45 दिवसांपर्यंत व्याजमुक्त पेमेंट ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील त्यांच्या ग्राहकांना 30 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी देत आहे.
या सुरुवातीच्या पावलांवरून असे दिसून येते की, बँकिंग क्षेत्र या नवीन मॉडेलचा गांभीर्याने विचार करत आहे आणि भविष्यात ते आणखी गती घेऊ शकते.
