TRENDING:

RBI Repo Rate: अमेरिका-इराण युद्धविराम, RBI ने जाहीर केला रेपो रेट, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Last Updated:

अमेरिका इराण युद्धसंघर्षात पाकिस्तानच्या मध्यस्थीने 15 दिवसांचा युद्धविराम, 10 एप्रिलला 10 मुद्द्यांवर चर्चा, आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवला, शेअर मार्केटवर परिणाम

advertisement
अमेरिका-इराण यांच्यात एक महिन्याहून अधिक काळ युद्धसंघर्ष सुरू असल्याने जगाचं टेन्शन वाढलं होतं. अखेर रात्री उशिरा पाकिस्तानच्या मध्यस्तीनंतर युद्धसंघर्ष युद्धसंघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं युद्धविरामाची तात्पुरती घोषणा केली आहे. 15 दिवस कोणतेही हल्ले होणार नाहीत. 10 एप्रिल रोजी 10 मुद्द्यांवर दोन्ही देश चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच दरम्यान महागाई प्रचंड वाढली, LPG चा तुटवडा आणि बाकी गोष्टी महाग झाल्या आहेत. त्याच दरम्यान आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे.
RBI
RBI
advertisement

आरबीआयने जाहीर केलेल्या नव्या पतधोरणानुसार कोणताही बदल झालेला नाही. रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा शेअर मार्केटवर देखील परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की या महिन्यात तुमच्या घराचं किंवा गाडीचं कर्ज स्वस्त होईल, तर आरबीआयने तुमच्या या आशेवर पाणी फिरवलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मौद्रिक धोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज व्याजाच्या दरांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला.

advertisement

रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, सध्याचा रेपो रेट ५.२५ टक्के इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी व्याजात कपात होण्याचे संकेत दिले होते, मात्र जागतिक परिस्थिती पाहता गव्हर्नरांनी सुरक्षित भूमिका घेण्याला प्राधान्य दिलं आहे.

तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?

advertisement

बँका आपले गृहकर्ज आणि इतर किरकोळ कर्जाचे दर आरबीआयच्या 'रेपो रेट'शी जोडतात. रेपो रेट कमी झाला की ईएमआय कमी होतो. मात्र, आता दर स्थिर राहिल्यामुळे. होम लोन आणि ऑटो लोनबाबत तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होणार नाही.ज्यांनी स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत घर खरेदी थांबवली होती, त्यांना आता जुन्याच दराने कर्ज घ्यावे लागेल. गव्हर्नरांच्या मते, पश्चिम आशियातील युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे.

advertisement

व्याजदर कमी करण्यापेक्षा सध्या देशाची विकास दर टिकवून ठेवणे आणि आर्थिक उपाययोजनांना बळ देणे आरबीआयला अधिक महत्त्वाचे वाटत आहे. बैठकीत सहभागी झालेल्या बहुतांश सदस्यांनी सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कपात करणे जोखमीचे ठरेल, असे मत मांडल्याने हा निर्णय घेण्यात आला.

ज्या दराने रिझर्व्ह बँक देशातील इतर बँकांना कर्ज देते, त्याला रेपो रेट म्हणतात. जेव्हा बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे मिळतात, तेव्हा त्या ग्राहकांसाठीही व्याजाचे दर कमी करतात. मात्र, आता आरबीआयनेच दर स्थिर ठेवल्याने बँकांकडेही व्याज कमी करण्याचा पर्याय उरलेला नाही. पश्चिम आशियात पेटलेलं युद्ध आणि वाढत्या महागाईच्या भीतीमुळे सध्या तरी कोणताही दिलासा मिळालेला नाही. ज्या गोष्टींचे दर वाढले ते पुन्हा कमी होतील याची शाश्वतीही नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
RBI Repo Rate: अमेरिका-इराण युद्धविराम, RBI ने जाहीर केला रेपो रेट, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल