TRENDING:

Success Story: नोकरीपेक्षा व्यवसाय बरा, इंजिनिअर तरुणाने सुरू केले नाश्ता सेंटर, महिन्याची कमाई पाहाच!

Last Updated:

स्वप्न पाहायची हिंमत असेल आणि त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी असेल, तर यश आपोआप जवळ येतं. याचे उत्तम असे उदाहरण नाशिकमधील वैभव जोशी हा तरुण ठरतोय.

advertisement
नाशिक : स्वप्न पाहायची हिंमत असेल आणि त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी असेल, तर यश आपोआप जवळ येतं. याचे उत्तम असे उदाहरण नाशिकमधील वैभव जोशी हा तरुण ठरतोय. एकेकाळी तो मेकॅनिकल इंजिनिअर होता. पण आता एक यशस्वी युवा खाद्यउद्योजक म्हणून नाशिक ओळखल्या जात आहे.
advertisement

वैभव जोशी या तरुणाने इडीलिशियस हब या नावाने नाश्ता सेंटर सुरू केले आहे. तसेच हा तरुण या व्यवसायाच्या माध्यमातून देखील आज यशस्वी रित्या 60 ते 70 हजाराचे उत्पन्न देखील घेत आहे.

वैभव यांनी आपलं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पूर्ण केलं आणि त्यानंतर वैभव याने तब्बल दहा वर्षे नोकरी केली. पगार चांगला होता, स्थैर्य होतं पण इतरांच्या हाताखाली काम करण्यामध्ये समाधान मिळत नसल्याचे वैभव याने सांगितले. व्यवसायाचा किडा लहानपणापासून मनात होताच कारण वैभव हा गुजराती कुटुंबात वाढलेला, जिथे उद्योजकता ही संस्कृती आहे. पण घरच्यांच्या सांगण्यावरून शिक्षण करून नोकरीस सुरुवात केली असता कोविड काळ हा त्याच्या व्यवसायात येण्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

advertisement

Success Story: फूड व्हॅन घेऊन पैसे कमावायचे? जालन्याचा सुनील महिन्याला कमावतो 60 हजार, फक्त या चुका टाळल्या!

कोविडमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. यात वैभव याचे देखील हातचे काम सुटले. त्यांनतर आपण व्यवसायात उतरू म्हणून त्याने कुठला व्यवसाय करावा हे शोधण्यास सुरुवात केली. असता एक गोष्ट त्याच्या लक्षात आली, फूड इंडस्ट्री कधीच बंद पडली नाही.

advertisement

त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायचं आहे जे लोकांच्या आरोग्याशी संबंधित असेल आणि त्यांना रोज उपयोगी पडेल. याकरता त्याने इडीलिशियस हब या खाद्यपदार्थाच्या व्यवसायला सुरुवात करण्याचे ठरविले. फूड बिझनेस सुरू करायचं ठरवल्यावर त्यांनी युट्यूबवर भरपूर संशोधन केलं. शेकडो व्हिडीओ पाहून वैभव यांना इडली या पदार्थात वेगळेपण आणायचं सुचलं. त्यानंतर याने नाशिकमध्ये प्रथमच वाटी इडली ही सुरू केली. जी आज त्याची ओळख बनली आहे. त्यानंतर त्यांनी स्टफ्ड इडली, मसाला इडली, पिरी पिरी फ्राय इडली यांसारखे युनिक आणि हेल्दी व्हेरिएशन्स सुरू केले आणि नाशिककर ग्राहकांनी त्यांचं भरभरून स्वागत केलं.

advertisement

परिवाराचे त्याच्या व्यावसायाला मोठा आधार

वैभव याच्या या व्यवसायात त्यांचे आई-वडील त्यांना खंबीर साथ देत आहेत. सगळे पदार्थ हे ते स्वतः ताजे बनवतात. कोणताही प्रीमेड मिक्स किंवा पॅकेजिंगचा शॉर्टकट ते वापरत नाही. त्यामुळेच आज इडीलिशियस हब हे केवळ एक फूड ब्रँड नाही, तर एक विश्वासाचं नाव बनले आहे. तसेच यांनी इतरांना रोजगार मिळावा याकरता त्यांचे हे पदार्थ होलसेल भावात विकण्यास सुरुवात केली आहे.

advertisement

इडीलिशियस हब कोठे आहे?

आज वैभव हा नाशिकच्या विविध ठिकाणी आपली सेवा देतोय. तसेच त्याचे हे दुकान तपोवन, हीरवाडी (बनारसी नगर) यांसारख्या ठिकाणी इडीलिशियस हब असून ऑनलाइन होम डिलिव्हरी सेवा सुद्धा सुरू आहे.

मराठी बातम्या/मनी/
Success Story: नोकरीपेक्षा व्यवसाय बरा, इंजिनिअर तरुणाने सुरू केले नाश्ता सेंटर, महिन्याची कमाई पाहाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल