TRENDING:

Valentine’s Day निमित्तानं नवीन फ्रॉड बाजारात, प्रत्येक कपलना माहित असायला पाहिजे हा Scam, नाहीतर खिसा होईल रिकामी

Last Updated:

प्रेमाचा हा दिवस आनंदाने साजरा करा, पण डिजिटल जगात वावरताना सावधगिरी बाळगा. कारण तुमची एक छोटीशी चूक या व्हॅलेंटाईन डेला 'महागात' पाडू शकते.

advertisement
मुंबई : फेब्रुवारी महिना सुरू झाला की हवेत एक वेगळाच गुलाबी गारवा जाणवू लागतो. निमित्त असतं ते म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'चं (Valentine’s Day). बाजारात गुलाबांची फुले, चॉकलेट्स आणि गिफ्ट्सची लगबग सुरू होते. आपल्या जोडीदाराला कसं खुश करायचं, त्यांना काय सरप्राईज द्यायचं, याचे बेत आखले जातात. पण मित्रांनो, या प्रेमाच्या वातावरणात फक्त तुम्हीच तुमच्या जोडीदाराचा विचार करत नाहीये, तर काही लोक तुमच्या 'खिशाचा'ही विचार करत आहेत.
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

हो, तुम्ही बरोबर वाचलत! ज्याप्रमाणे तुम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहात, तसेच 'ऑनलाइन स्कॅमर्स' (Scammers) देखील तुमची शिकार करण्यासाठी जाळी पसरवून बसले आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली तुमचे बँक खाते रिकामे करण्याचे नवनवीन सापळे सध्या डिजिटल जगात रचले जात आहेत. हे स्कॅम्स नेमके कसे असतात आणि तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता? जाणून घेऊया या खास रिपोर्टमध्ये.

advertisement

1. रोमान्स स्कॅम: 'फर्जी' प्रेमाचं नाटक

व्हॅलेंटाईन डेच्या काळात डेटिंग अ‍ॅप्स आणि सोशल मीडियावर अनोळखी लोकांचे मेसेज येण्याचे प्रमाण वाढते. हे स्कॅमर्स आकर्षक प्रोफाईल फोटो वापरून तुमच्याशी जवळीक निर्माण करतात. काही दिवस गोड बोलून विश्वास संपादन केला की, मग सुरू होतं खरं नाटक! "मला मेडिकल इमर्जन्सी आहे" किंवा "तुला भेटायला यायचंय पण पैसे कमी पडतायत" असं सांगून ते तुमच्याकडे पैशांची मागणी करतात. एकदा का तुम्ही पैसे पाठवले की, ते लोक चक्क 'गायब' होतात.

advertisement

2. सरप्राईज गिफ्ट आणि बनावट डिलिव्हरी मेसेज

अचानक तुम्हाला एक मेसेज येतो की, "तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आले आहे, पण पत्ता कन्फर्म करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा" किंवा "एक ओटीपी (OTP) सांगा." लक्षात ठेवा, तुमची कोणतीही माहिती न घेता कोणीही तुम्हाला महागडं गिफ्ट पाठवत नाही. अशा लिंकवर क्लिक करताच तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारला जाऊ शकतो.

advertisement

3. स्वस्त शॉपिंगच्या नावाखाली फसवणूक

व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी आपण ऑनलाइन सेल शोधत असतो. याचाच फायदा घेत स्कॅमर्स हुबेहूब नामांकित कंपन्यांसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स तयार करतात. तिथे "90% डिस्काउंट" सारखे मोठे ऑफर्स दिले जातात. अशा वेबसाइटवर तुम्ही तुमची कार्ड डिटेल्स भरली की, तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसे दोन्ही चोरीला जातात. नेहमी विश्वासार्ह आणि 'https' असलेल्या वेबसाइटवरूनच खरेदी करा.

advertisement

4. गिव्हअवे (Giveaway) स्कॅम

"फ्री डिनर जिंका", "लक्झरी हॉलिडे पॅकेज मिळवा" अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत असतात. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायला लावला जातो आणि 'प्रोसेसिंग फी' म्हणून काही पैसे मागितले जातात. हे सर्व तुमचे डेटा आणि पैसे चोरण्याचे मार्ग आहेत.

स्वतःला सुरक्षित कसं ठेवाल?

अनोळखी लोकांशी आर्थिक व्यवहार टाळा: इंटरनेटवर भेटलेल्या व्यक्तीला कधीही पैसे किंवा गिफ्ट कार्ड पाठवू नका.

सेंसेटिव्ह माहिती शेअर करू नका: बँक डिटेल्स, ओटीपी किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.

लिंकवर क्लिक करताना विचार करा: संशयास्पद मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची खातरजमा करा.

अधिकृत अ‍ॅप्स वापरा: डेटिंग किंवा शॉपिंगसाठी फक्त नामांकित आणि अधिकृत अ‍ॅप्सचाच वापर करा.

मराठी बातम्या/मनी/
Valentine’s Day निमित्तानं नवीन फ्रॉड बाजारात, प्रत्येक कपलना माहित असायला पाहिजे हा Scam, नाहीतर खिसा होईल रिकामी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल