वेट ग्राइंडर या यंत्राचे जीवन पंधरा ते वीस वर्षांचे आहे. तसेच इडली डोसा करताना लागणारे तांदूळ तसेच पुरणपोळीचे पुरण देखील यामध्ये वाटले जातात. तसेच कोरड्या पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला, धने - जिरा देखील वाटला जातो. एका वेळेला कमीत कमी मूठभर आणि जास्तीत जास्त अर्धा किलो वाटण यामध्ये निघते. तर मोठ्या यंत्रामध्ये एक किलोपर्यंत वाटण निघते. तसेच पोळ्यांच्या बाबतीत इडलीसाठी दोन पोळ्या आणि जास्तीत जास्त बारा पोळ्यांपर्यंत ओला आटा निघतो. तर मोठ्या यंत्रांमध्ये पाच पोळ्या ते पंचवीस पोळ्यांपर्यंत आटा काढला जातो.
advertisement
Success Story : शेतात केला सोपा प्रयोग, अद्रक लागवडीचा प्रयोग ठरला हिट, वर्षाला 7 लाखांची कमाई
यंत्राची किंमत किती?
वेट ग्राइंडर या छोट्या यंत्राची किंमत 7,800 तर आणि मोठे यंत्र 8,700 रुपयांना उपलब्ध आहे. दोन्ही यंत्रांवर एक हजार रुपयांचे डिस्काउंट मिळते. तसेच यंत्रासाठी दोन वर्षांची वॉरंटी असणार आहे. यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यास दोन वेळेस सेवा मोफत दिली जाणार आहे.